spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

China : चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; व्हिडिओ होतोय व्हायरल

चीनमध्ये एका गगनुचंबी इमारतीला भीषण आग लागल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. २०० मीटर उंचीच्या या इमारतीचे जवळपास सर्वच मजले या आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत.

चीनमध्ये एका गगनुचंबी इमारतीला भीषण आग लागल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. २०० मीटर उंचीच्या या इमारतीचे जवळपास सर्वच मजले या आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. मध्य चीनच्या चांग्शा शहरात शुक्रवारी या गगनचुंबी इमारतीला आग लागली, अधिकारी म्हणाले की अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 इमारतीला लागलेल्या भीषण आगेचा व्हिडिओ सध्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पहिल्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत उठणाऱ्या ज्वाळा पाहून धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. २०० मीटर अर्थात ६५६ फूट उंचीच्या या इमारतीचे डझनावर मजल्यांना या आगीनं वेढलं आहे. या आगीमुळं आकाशात उंच दाट धुराचं साम्राज्य पसरलं आहे. चीनच्या हुनान या दक्षिण प्रांताची राजधानी चांगशा इथं ही दुर्घटना घडली आहे. सरकारी मालकीच्या टेलिकम्युनिकेशन कंपनीचे कार्यालय असलेल्या ४२ मजली इमारतीत ही आग लागली. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत पण यामध्ये जीवितहानी झालीए का? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

चायना टेलिकॉमने सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे: “आज दुपारी साडेचार वाजेपर्यंत, चांगशा येथील आमच्या नंबर २ कम्युनिकेशन टॉवरला लागलेली आग विझवण्यात आली आहे. “कोणतीही जीवितहानी अद्याप सापडलेली नाही आणि संप्रेषण तोडलेले नाही.”

 यापूर्वी २०१७ मध्ये बीजिंगच्या स्थलांतरित शेजारच्या आगीत आणखी दोन डझन लोक मरण पावले, तर २०१० मध्ये २८ मजली शांघाय हाऊसिंग ब्लॉकला लागलेल्या आगीत ५८ जणांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

लम्पीपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी आता क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई पोलिसांकडून प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss