अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh ) यांना ८ सप्टेंबर रोजी कन्या झाली. डिलिव्हरीच्या नऊ दिवसांनंतर आज १५ सप्टेंबर रोजी दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharged From Hospital) मिळाला आहे. रुग्णालयातून दीपिका आणि रणवीर हे आपल्या लाडक्या लेकीसह घरी पोहचले आहेत. त्यादरम्यान ते मीडियाच्या कॅमेरात कैद झाले आहेत. दीपिका रणवीर आपल्या लाडक्या परीला घेऊन घरी पोचहताना दीपिकाचा लेकीला हातात घेऊन असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.
डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यात दीपिका आणि रणवीर यांची झलक दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरचे हे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यावर चाहत्यांनी भरपूर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता सर्व चाहत्यांना रणवीर आणि दिपीकाच्या चिमुकलीचा चेहरा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ही चिमुकली कोणासारखी दिसते हे पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. पण चाहत्यांना काही काळ अजून वाट पाहावी लागणार आहे. कारण दीपिका रणवीर देखील, विराट कोहली-अनुष्का शर्मा व रणबीर कपुर-आलिया भट्ट यांसारखीच नो-फोटो पॉलिसीचा अवलंब करणार आहे. दीपिका सुद्धा आपल्या मुलीला सोशल मीडिया सारख्या माध्यमांपासून दूर ठेवणार आहे.
डिलिव्हरीनंतर दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील बायो सुद्धा बदलला आहे. दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टा बायो लिहिलं की, ‘फीड, बर्प, स्लीप, रिपीट. (Feed. Barp.Sleep.Repeat ) त्यामुळे तिने आता तिचे जीवन बाळाभोवती फिरणार असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे रिपोर्टनुसार, दीपिका तिच्या मुलीचा सांभाळ स्वतः करणार असल्याची माहिती मिळत आहे. मुलीच्या सांभाळासाठी ती नॅनी ठेवणार नसून मुलीचे स्वतः संगोपन करणार आहे. त्याचप्रमाणे दीपिका लवकरच रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ (Singham Again)या आगामी चित्रपटात दिसणार आहे.