spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता कारागृहात जन्मलेल्या बालकांना त्यांची ओळख मिळणार

कारागृहात आपले बालपण घालवणाऱ्या या निरागस, निष्पाप बालकांचा नक्की दोष हा काय असतो? गुन्हा त्यांच्या मातेने केला असतो.

कारागृहात आपले बालपण घालवणाऱ्या या निरागस, निष्पाप बालकांचा नक्की दोष हा काय असतो? गुन्हा त्यांच्या मातेने केला असतो. पण मातेने केलेल्या दोषाचे झळ त्यांच्या बालकांना देखील सहन करावी लागतेच. ही मुले त्यापासून फार लांब असतात. या मुलांच्या मातांनी केलेल्या गुन्ह्याची झळ मुलांना पोहोचू नये, त्यासाठी राज्य सरकारने आता एक नवीन निर्णय घेतला आहे.

राज्यातील सर्व कारागृहामध्ये (Jail) जन्म झालेल्या बालकांच्या जन्म दाखल्यामध्ये (Birth Certificate) जन्मस्थान कारागृह असे नमुद न करता ज्या शहरात किंवा गावात त्या बालकांचा जन्म झाला आहे त्या गावाचे नाव नमुद करावे, असे आदेश राज्य सरकारने (Maharashtra Government) दिले आहे. महाराष्ट्र सरकारने नुकताच एक जीआर जारी केला असून सर्व तुरुंगांना नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. याबाबत सर्व कारागृह अधीक्षकांनी काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशे आदेश व परिपत्रक जारी करण्यात आले.

तुरूंगात मुलाचे संगोपन करणे हे कोणत्याही आईसाठी क्लेशदायक आहे. काही प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या महिला कैदी गर्भवती असतात आणि तुरुंगातच मुलाला किंवा मुलीला जन्म देतात. त्यामुळे एका नवजात बालकाला सोनेरी दिवसांचे सुख अनुभवण्याऐवजी त्याच्या आईबरोबर तुरुंगाच्या गजाआड आपल्या आयुष्याची सुरुवात करावी लागते. मुलांना त्यांच्या आईच्या गुन्ह्यांची झळ लागू नये म्हणून सर्व कारागृह अधीक्षकांनी काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशे आदेश व परिपत्रक जारी करण्यात आले.

 

हे ही वाचा:

boycott thankgodmovie : अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’ ह्या चित्रपटावर बहिष्कार टाकायची ‘या’ देशाची मागणी

नोरा फतेही आणि सिद्धार्थ मल्होत्राचे थँक गॉडमधील नवे गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीस

China : चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; व्हिडिओ होतोय व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss