spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune Ganesh Visarjan 2024: पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी १७ रस्ते बंद; वाहतूक व्यवस्थेत हे मोठे बदल

Pune Ganesh Visarjan 2024: पुण्यात विसर्जनाच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने काही मोठे बदल केले आहेत. १७ सप्टेंबर रोजी विसर्जन मार्ग व मध्यभागावरील १७ रस्ते बंद राहणार आहेत. परंतु वाहन चालकांना पर्यायी मार्गांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी पाच वाजल्यापासून हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत व विसर्जन कार्यक्रमाची सांगता होताच रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील.

मंगळवारी म्हणजेच १७ सप्टेंबरला सकाळी विसर्जनासाठी प्रथम पुण्यातील सर्वच मानाचे गणपती मिरवणुकीसाठी बाहेर पडतील. त्यानंतर इतर सार्वजनिक गणपती विसर्जसाठी निघतील. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्यभागातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, केळकर रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रोड, बगाडे रोड, गुरू नानक रोड क या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहील. या दरम्यान जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलीयार रस्त्यावरील दारूवाला पुल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलीस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, बाजीराव रस्त्यावरील वीर सावरकर पुतळा चौक, लाल बहाद्दूर शास्त्री रोडवरील सेनादत्त पोलीस चौकी, कर्वे रोडवरील नळस्टॉप, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गुडलक चौकातून डायव्हर्शन पाँईट काढले गेले आहेत.

पार्किंगची व्यवस्था कुठे?
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाद (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठे, एच.व्ही.देसाई महाविद्यालय, हमालवाडा, नारायणपेठ (दुचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर, पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग (दुचाकी), हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूर ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह, विमलाबाई गरवाले प्रशाला, डेक्कन जिमखाना, संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता, फर्ग्युसून कॉलेज, दैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता , मराठवाडा कॉलेज (दुचाकी), पेशवे पथ (दुचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता, नदीपात्र भिडे पूल ते गाडगीळ पूल याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पोलिसांचा बंदोबस्त कसा असेल?
विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गांवरून मिरवणूक जाणार आहे. पुण्यात विसर्जन कार्यक्रमात साडेसहा हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार असून मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरांचीही सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक १३५, अतिरिक्त पोलीस आयुक्त ४, सहायक पोलीस आयुक्त २५, पोलीस उपायुक्त १०, पोलीस कर्मचारी ५७०९, गृहरक्षक दल जवान ३९४, राज्य राखीव पोलीसांची एक तुकडी.

Latest Posts

Don't Miss