spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Women Health : महिलांनो पार्लरमध्ये जाता, पण ‘या’ ५ चुकांकडे का लक्ष देत नाही…?

सध्या सणासुधीचा दिवस सुरु आहेत. पण बहुतांश महिला ह्या सौंदर्य वाढवण्यासाठी पार्लरमध्ये जातात. पण काही महिलांना अचानक त्वचेचची ऍलर्जी किंवा आजरा घेऊन परतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पार्लरमध्ये मेकअप किंवा कोणतीही ब्युटी ट्रीटमेट घेताना बहुतेक महिला काही सामान्य छोट्या,मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे आरोग्याला नाही तर त्वचेलाही हानी पोहचते. कोणतीही ब्युटी ट्रीटमेट घेताना किंवा पार्लरमध्ये मेकअप करताना अनेक महिला काही सामान्य चुकांकडे लक्ष देत नाहीत.

पार्लरमध्ये जात असाल तर या चुका टाळा :
लग्नापासून तर सणासुदीपर्यंत पार्लरमध्ये थ्रेडींगपासून ते फ़ेशियल, हेअरकट,मेकअप,मॅनिक्युअर-पेडिक्योर अशी अनेक कामे केली जातात, त्यामुळे कधी ना कधी पार्लरमध्ये जावे लागते. जर तुम्ही अश्या प्रसंगाला ब्युटी केअर किंवा मेकअप इत्यादीसाठी पार्लरमध्ये जात असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. नाही तर तुमचे सौंदर्य वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्यासोबत त्वचेच्या आरोग्यच्या समस्या घरी आणू शकता किंवा त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. सध्या अश्या अनेक प्रकारच्या समस्यामध्ये वाढ होत आहेत.

तुमच्या त्वचेच्या हेलथ ला तुम्हाला न कळत हानी पोहोचते :
महिलांनी कोणत्याही प्रकारची ब्युटी ट्रिटमेट घेताना किंवा पार्लरमध्ये मेकअप करताना बहुतांश महिला छोट्या,सामान्य चुकांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे जाणूनबुजून किंवा नकळत महिलांच्या आरोग्याला आणि त्वचेला हानी पोहोचते. जाणून घेऊया ज्या गोष्टीकडे बहुतके महिला पार्लरमध्ये लक्ष देत नाहीत.

मेकअप ब्रश वापर :
अनेक पार्लर मध्ये एकाच दिवसात मेकअप करण्यासाठी अनेक महिला येतात. अश्या परिस्थितीमध्ये ब्रश खूप घाणेरडे होतात. आणि तोच ब्रश अनेकांच्या चेहऱ्यावर वापरतात. तेही न साफ करता. ह्या वापरळांमुळे त्वचेची ऍलर्जी होऊ शकते आणि विशेषतः संवेदनशील त्वचेची काळजी घेणाऱ्याना हे आवश्यक आहे.

प्रॉडक्ट्स तपासा :
मेकअप पासून ते ब्युटी प्रॉडक्टपर्यंत अनेकादा या उत्पादनाची एक्सपायरी डेट न तपासण्याची आणि त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवण्याची चूक अनेक महिला करतात. यामुळे तुमच्या त्वचेला खूप हानिकारक नुकसान होते.

ह्या गोष्टीमुळे स्वच्छेतेची काळजी घ्या :
पार्लरमध्ये बहुतेक कामे थ्रेडींग,वॅक्सिन्ग,फेशिल,मॅनिक्युर-पेडिक्योर केली जातात. अशा परिस्थतीत धाग्याची स्वछता,पाण्याचे टब आणि त्यात वापरण्यात येणारे उपकरणे व फेशिल करताना. हाताची स्वछता याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss