spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganpati Visarjan साठी पोलीस प्रशासन सज्ज, मुबंई-पुण्यातील गणपती मिरवणुकीला होणार सुरुवात

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या अशाच भावना मनात ठेवून आज गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. लालबागचा राजा (Lalbaucha Raja) तसेच तेजू काया मंडळाकडून बाप्पाची पूजा पार पडली आहे. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुकीला मुंबईत सुरुवात होणार आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अकरा दिवसानंतर गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबईच्या गिरगाव (Girgaon) चौपाटीवर पोलिस आणि महानगरपालिकेकडून तयारी करण्यात आली आहे. महानगरपालिका आणि पोलिसांकडून नियंत्रण कक्ष बनवण्यात आले असून गणपतीच्या विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या गणपती मूर्ती असतात त्या गिरगाव चौपाटीवर विसर्जित केल्या जातात. मुंबईचा राजा (Mumbaicha Raja),  चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpokalicha Chintamani), लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) या सर्व गणपती मूर्तींचे विसर्जन गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) येथे केले जाते.

मुंबईचा राजा (Mumbaicha Raja) म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश गल्लीच्या गणपती बाप्पाची उत्तर पूजा सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे. गणेश गल्लीच्या राजासाठी बाप्पाच्या मंडपात भाविकांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. उत्तर पूजा संपन्न झाल्यानंतर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील मानाचा पहिला गणपती मानला जाणारा कसबा गणपतीच्या मिरवणुकीसाठी रथ सजवण्यात आला असून दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात आली आहे.

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 200 सार्वजनिक गणपती मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होणार असून त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी सण उत्साह साजरा करताना जबाबदारी व उत्साह पूर्वक साजरा करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली आहे. संवेदशील भागात सीसीटीव्ही कॅमेराद्वारे पोलिसांची नजर राहणार असून संपूर्ण मिरवणुकीत ड्रोनद्वारे पोलिसांचे लक्ष राहणार आहे. मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस विभागातर्फे संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. नागरिकांनी उत्साह पूर्वक गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss