spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Narendra Modi Birthday 2022 : मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार ‘हि’ खास गोष्ट

उद्या दि. १७ सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिम्मित देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींचे आयोजन हे करण्यात आले आहे.

उद्या दि. १७ सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिम्मित देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींचे आयोजन हे करण्यात आले आहे. एकीकडे दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथल्या ARDOR 2.1 या हॉटेलमध्ये ५६ पदार्थ असणारी थाळी मिळणार आहे आणि हि थाळी जर संपवली तर साडे आठ लाख रुपये मिळणार आहे तर आता दुसरीकडे मोदींच्या जन्मदिनी जन्मलेल्या बाळाला सोन्याची अंगठी मिळणार आहे.

हे ही वाचा: नरेंद्र मोदी एक प्रभावशाली व्यक्तिमहत्व, वाचा प्रधान मंत्रींच्या संघर्षाचा प्रवास

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये देखील भारतीय जनता पक्षाच्या राज्य युनिटकडून १७ सप्टेंबर रोजी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या देण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर रोजी सर्व लहान मुलांना हि सोन्याची अंगठी मिळणार असून हि अंगठी सुमारे २ ग्रॅमची असेल.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले की, भाजपचे तामिळनाडू युनिट नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या देण्यात येतील. यासोबतच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत ७२० किलो मासळी वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भाजपने चेन्नईतील आरएसआरएम रुग्णालयाची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली. जिथे १७ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या सर्व मुलांना २ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाईल, या अंगठीची किंमत सुमारे ५ हजार रुपये आहे.

याबाबत आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बलियान यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले आहेत की, मोफत पाणी आणि वीज त्यांना खूप जड वाटत होती. मुकुल रोहतगी सुप्रीम कोर्टात यावर काय बोलणार? या फुकटच्या रेवडी नाहीत का, असा सवालही त्यांनी केला.

 

हे ही वाचा:

PM Modi Birthday : ‘५६ इंच’ थाळी संपवा आणि जिंका ‘साडे आठ लाख’ रुपयांचं बक्षीस

फसवणूक केल्यामुळे गॉड फादर चित्रपटावर संतापले चाहते

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss