spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ही शान कुणाची… लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.

Ganpati Visarjan 2024 : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबईतील लालबाग-परळमध्ये सध्या गणेश भक्तांचा महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे. गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे लालबाग मध्ये देखील गणपती बाप्पा निघण्याची जोरदार तयारी ही चालू झाली आहे. दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागचा राजा मंगळवारी सकाळी विसर्जनासाठी मंडपातून निघाला आहे. यापूर्वी मंडपातील कार्यकर्ते आणि अन्य भक्तांनी डोळे भरुन राजाचे दर्शन घेतले. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ९.३० च्या दरम्यान लालबागच्या राजाची विधीवत पूजा पार पडत आरती (Lalbaugcha Raja Aarti) होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ च्या दरम्यान, लालबागचा राजा (Lalbaugcha Raja Pandal) मंडपातून बाहेर पडताना दिसेल. लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक (Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk) आज सकाळी ११ वाजता लालबाग मार्केटमधून निघणार आहे. लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालाय. थोड्याच वेळात पारंपरिक कोळी नृत्य आणि कोंबडी बाजानं राजाला सलामी दिली जाणार आहे.

महाराष्ट्राच्या महाउत्सवाची आज सांगता होणार आहे. सध्या लालबागमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच लालबागमध्ये सध्या पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा केल्यावर आज त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे. सध्या लालबागमधील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरात ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या राजेशाही मिरवणुकीला लवकरच सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईचा राजा अशी ओळख असलेला गणेशगल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

Marathwada Mukti Sangram Day: मग बघा माझ्यासकट माझा आख्खा पक्ष तुमच्यासाठी उभा राहील, काय म्हणाले Raj Thackeray?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss