spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीच्या आधीचा ‘हा’ किस्सा माहित आहे का तुम्हाला? जाणून घ्या सविस्तर…

PM Narendra Modi Birthday : आज १७ सप्टेंबर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस. पंतप्रधान मोदींचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. दामोदरदास मोदी आणि हिराबा मोदी यांच्या सहा मुलांपैकी नरेंद्र मोदी हे तिसरे अपत्य आहेत. पंतप्रधान मोदी हे त्यांच्या तरुणपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सदस्य आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द १९७० पासून सुरू झाली. १९९० पर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला फारशी गती नव्हती. पंतप्रधान मोदींच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अशीच एक घटना १९९० मधली आहे, जेव्हा तिकीट असूनही ते ट्रेनच्या फरशीवर झोपले होते.

पंतप्रधान मोदींचा हा किस्सा लीना सरमा यांनी सांगितला होता. लीना त्या काळात रेल्वेमध्ये ‘सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम’च्या महाव्यवस्थापक होत्या. द हिंदूमध्ये लिहिलेल्या लेखात लीना सांगतात की, ”जेव्हा ‘इंडियन रेल्वे (ट्रॅफिक)’ प्रोबेशनवर होती, तेव्हा त्यांचा लखनौ ते दिल्ली हा प्रवास खूप वाईट होता. त्यावेळी काही राजकारण्यांनी ट्रेनमध्ये त्यांच्याशी आणि त्यांच्या मित्रमंडळींसोबत गैरवर्तन केले होते. तेव्हा तिकीट असताना सुद्धा त्यांना सीट सोडावी लागली होती. लीना यांनी सांगितले की, त्यांना आणि त्यांच्या मित्राला अहमदाबादला जायचे होते. पण लखनौहून दिल्लीला पोहोचल्यावर त्यांच्या मित्राने पुढचा प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेव्हा त्यांना त्यांचा एक बॅचमेट सापडला, त्यानंतर दिल्ली ते अहमदाबादचा प्रवास सुरू झाला. यावेळी त्यांच्याकडे तिकिट सुद्धा नव्हते, कारण वेळेअभावी त्यांची व्यवस्था होऊ शकली नाही. मात्र टीटीईशी बोलल्यानंतर दोघांनाही एकाच बोगीत बसण्याची परवानगी मिळाली.

कोण होते ते दोन नेते?

ते दोघे ज्या डब्ब्यात बसले होते, तिथे सुरुवातीपासूनच दोन नेते बसले होते. ते दोन नेते म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून नरेंद्र मोदी आणि शंकरसिंह वाघेला होते. डब्यात पोहोचताच दोन्ही नेत्यांनी लीना आणि त्यांच्या बॅचमेटसाठी जागा केली. लीना यांनी सांगितले की, रात्री जेवण झाल्यावर टीटीई आले आणि त्यांनी सांगितले की, झोपण्याची व्यवस्था करणे शक्य नाही. हे ऐकताच पंतप्रधान मोदी आणि शंकरसिंह वाघेला उभे राहिले आणि म्हणाले, ‘काही हरकत नाही, आम्ही व्यवस्था करू.’ त्यांनी ताबडतोब ट्रेनच्या फरशीवर एक कपडा पसरवला आणि त्यावर झोपले. यावेळी त्यांनी आपली जागा लीना आणि त्यांच्या बॅचमेटला दिली.” म्हणूनच लीना यांचा अनुभव त्यांच्या आधीच्या ट्रेन प्रवासाच्या अनुभवापेक्षा खूप वेगळा होता.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss