spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Big Boss Marathi season 5: बदलणार घरातील नात्यांची समीकरणं; डीपी दादा नेमकं कोणाच्या बाजूने खेळणार खेळी?

बिग बॉसच्या घरातील नात्यांची समीकरणं ही दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. एकाच टीममधून खेळत असलेले काही सदस्य नेमकी आपण कोणत्या टीममधून खेळत आहोत हे आता स्पष्ट करत आहेत. नुकतेच धनंजय पोवार (Dhanjay Powar) अर्थात डीपीदादा यांनी हे स्पष्ट केले आहे.

बिग बॉस मराठी सिझन ५ (Big Boss Marathi Season 5) आता आठव्या आठवड्यात सुरु झाला आहे. या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क नुकताच पार पाडला. या नवीन झालेल्या टास्कमध्ये घरातील पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तसेच बिग बॉसच्या घरातील नात्यांची समीकरणं ही दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. एकाच टीममधून खेळत असलेले काही सदस्य नेमकी आपण कोणत्या टीममधून खेळत आहोत हे आता स्पष्ट करत आहेत. नुकतेच धनंजय पोवार (Dhanajay Powar) अर्थात डीपीदादा यांनी हे स्पष्ट केले आहे.

घरातील सदस्य आपला खेळ दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. खेळ दाखवताना कधी कोण कोणाचा गेम पलटेल याचा अंदाज सांगता येत नाही. पहिल्या आठवड्यात दिसणाऱ्या एका टीममध्ये सदस्य आता दुसऱ्या टीममध्ये जाताना दिसत आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे आता एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून आपल्या टीममधून खेळणारे धनंजय पोवार हे आपल्या टीममधून काहीसं वेगळं राहून वेगळी खेळी खेळणार आहेत.

बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये डीपीदादा आणि निक्की तांबोळी हे चर्चा करताना दिसत आहेत. डीपी दादा निक्कीशी बोलतात की, “मी कोणत्याही टीमचा भाग नाही आहे. स्ट्रॅटजीच्याबाबतीत कोण बोलत होतं”. त्यावर संग्राम डीपी दादाचं नाव घेतो. तर त्यावर निक्की म्हणते की, “पण दिसलं नाही ना”. त्यावर डीपी दादा निराश होऊन बोलतात की, “मी अभिजित आणि अंकितामुळे सावली झालो”. डीपी दादा पुढे म्हणतात की, “मला जर दिसायचंय तर मी तुमच्यात खेळू शकत नाही”. नेहमी अंकिताच्या पाठीशी असणारे तिला वेळोवेळी सल्ले देणारे डीपी दादा आता एकटं खेळताना दिसून येणार आहेत. इथून पुढे डीपी दादा कसा खेळ खेळणार याकडे आता बिग बॉस चाहत्यांच्या नजर लागल्या आहेत.

बिग बॉसच्या मागील भागात टास्कमध्ये अपयशी ठरलेले निक्की तांबोळी, सुरज चव्हाण, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर आता घराबाहेर पाडण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. त्यामुळे या पाच सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.

CM Shinde यांचे इच्छुकांना ‘बिस्कीट’ वाटप, धाराशीव मध्ये एक जागा ६ भावी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss