spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganesh Chaturthi 2025 Date : पुढच्या वर्षी खरोखरंच गणपती बाप्पा लवकर येणार; २०२५ ला ऑगस्ट महिन्यातच होणार बाप्पा विराजमान…

Ganesh Chaturthi 2025 Date : देशभरात दरवर्षीच गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र पाहायला मिळत असते. त्याचप्रमाणे दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला गेला. आज अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन सर्वत्र केले जाणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला,चैन पडेना आम्हांला’ अश्या घोषणा आज सगळीकडेच कानावर पडत आहेत. पुढच्या वर्षी लवकर या… भक्तांची ही हाक बाप्पाने खरोखरचं ऐकली आहे. २०२५ मध्ये ११ दिवस आधीच गणेशोत्सव सुरु होणार आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्यातच गणपती बाप्पा पुढच्या वर्षी विराजमान होणार आहेत.

आज १७ ऑगस्टला यावर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा, गणेश गल्ली यांसारखे प्रतिष्ठीत गणपती मिरवणूकणीसाठी बाहेर पडले आहेत. मुंबईसह इतर अनेक आजूबाजूच्या शहरांमध्ये आज विसर्जनाची गर्दी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे जागोजागी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला गेला आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही निरीक्षणही केले जाणार आहे.

२०२५ मध्ये गणेश चतुर्थी कधी ? –

हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार असल्याची माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. त्यामुळे गणेश भक्तांना पुढच्या वर्षी जास्त वाट पाहावी नाही लागणार. पुढील वर्षी २ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी-गणपतींचं विसर्जन केले जाईल. पुढील वर्षी अनंत चतुर्दशी ६ सेप्टेंबरला म्हणजेच अकराव्या दिवशी होणार आहे. अश्याप्रकारे पुढील वर्षी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या दिवसांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. २०२५ म्हणजेच पुढच्या वर्षी गणेश भक्तांना गणेशोत्सवाची कमी वाट पाहावी लागणार आहे कारण सप्टेंबर महिन्याऐवजी ऑगस्ट महिन्यातच बाप्पा विराजमान होणार आहेत.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss