spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विध्यार्थींसाठी खुश खबर, राज्यसरकार गृहपाठ बंद करण्याच्या तयारीत

 राज्य सरकार पहिली ते हौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गृहपाठ बंद करण्याच्या विचारात आहे. जेव्हा पासून नवीन सरकार स्थापन झाले आहे तेव्हा पासून विविध विभागा मध्ये महत्वाचे निर्णय घेत आहे. गणेश उत्सव दहीहंडी असे अनेक महत्वाचे निर्णय आपण राज्य सरकारचे पहिले. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, माझे वैयक्तिक मत आहे की, मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. तसेच गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कमी वेळात पटकन समजेल असे शिकवावे, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही. अजून माझी शिक्षक संघटना, संस्था चालक त्यांच्याशी बोलणार आणि मग निर्णया बाबत विचार करू.

विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून मिळणार होमवर्क आता बंद होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. लवकरच तज्ञांशी चर्चा करुन याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्य सरकारकडून जर असा निर्णय घेण्यात आला तर घरी येऊन पुन्हा अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होणार आहे. हा निर्णय घेण्यामागे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळावा त्याद्वारे त्याच्या कलागुणांना वाव मिळावा हा हेतू आहे. आगामी शालेय शिक्षण वर्षात हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi Birthday 2022 : मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार ‘हि’ खास गोष्ट

गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा होमवर्क घेणे हे पालकांसाठी जिकरीचे असते. अशावेळी होमवर्क बंद झाल्यास पालकांचा ताण कमी होऊ शकतो असे म्हटले जात आहे. गृहपाठ बंद करण्याचा निर्णय घेत असताना पालक शिक्षक संस्थाचालक या सगळ्यांना विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पालक संघटनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांनमुळे आज शिवसेना उभी आहे ; राणेंचे वक्तव्य

प्रदूषण, धूळ आणि मातीमुळे श्वास घेण्यास त्रास होतोय ? तर, निलगिरी तेल वापरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss