spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातील गणपती विसर्जनच्या मिरवणूका काही पुढे सरकेना… मानाच्या गणपतींनी २०० मीटर अंतर पार करायला लागले तब्बल ५ तास…

आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे १० दिवसांच्या पाहुणचारानंतर आज (बुधवार, १७ सप्टेंबर) रोजी विसर्जन होणार आहे.

Pune Ganesh Visarjan 2024 : आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे १० दिवसांच्या पाहुणचारानंतर आज (बुधवार, १७ सप्टेंबर) रोजी विसर्जन होणार आहे. पुण्यामध्ये घरगुती गणपतीसोबतच पाच मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकींना सकाळी सुरुवात झाली असून मोठया थाटामाटात, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाड्याचा गणपती या पाचही मानाच्या गणपतींची मोठ्या धुमधडाक्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

पुण्यातील मानाच्या गणपतीचे विसर्जन अतिशय संथ गतीनं सुरु आहे. विसर्जन (Ganapati Visarjan) मिरवणूक सुरू झाली त्या मंडईच्या टिळक पुतळ्यापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या बेलबाग चौकात पाचवा मानाचा गणपती पोहचायला पाच तास लागले आहेत. पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीची मिरवणूक बरोबर साडे दहा वाजता सुरु झाली. त्या पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग तासाभराच्या फरकाने दोनशे मीटर वर असणाऱ्या बेलबाग चौकात पोहचले. त्यामुळं यंदा ही पुण्यातील गणपती विसर्जनाच्या (Ganapati Visarjan) मिरवणुका किती तास चालणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

गणपती विसर्जन मिरवणूक १०:३० वाजता सुरू झाली

मानाचा पहिला – कसबा गणपती
१०:३० – मिरवणुकीची सुरुवात
११:१० – बेलबाग चौकात
०३:३५ – अल्का चौक

मानाचा दुसरा – तांबडी जोगेश्वरी
१०:४० – मिरवणुकीला सुरुवात
१२:०० -बेलबाग चौक

मानाचा तिसरा – गुरुजी तालीम
११:१० – मिरवणुकीला सुरुवात
१:१२ – बेलबाग चौक

मानाचा चौथा – तुळशीबाग
११:५० – मिरवणुकीला सुरुवात
०२:२० – बेलबाग चौक

मानाचा पाचवा – केसरीवाडा
१२:२५ – मिरवणुकीला सुरुवात
०३:२३ – बेलबाग चौक

 

Latest Posts

Don't Miss