spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Hezbollah Pager Blasts: पेजर म्हणजे नेमकं काय? पेजरला हॅक करता येतं का?

लेबनॉन (Lebanon) या ठिकाणी मंगळवार १७ सप्टेंबर रोजी हीजबुल्लाहच्या (Hezbollah) नागरिकांच्या पेजरमध्ये स्फोट झाला. या स्फोटात 4000 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. इस्राईलकडून हल्ले वाचवण्यासाठी लेबनॉनकडून पेजरचा वापर करण्यात येत होता. पेजर हॅक करता येत नाही, असा त्यांचा समज होता. परंतु, आता पेजर हॅक करूनच हे स्फोट झाल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.

पेजर म्हणजे नेमकं काय?  

पेजर (Pager) हे असे गॅझेट आहे, ज्याच्या माध्यमातून मेसेज पाठवणे आणि मेसेज मिळवणे शक्य होतं. मोबाईल येण्यापूर्वी पेजर आले होते. त्यावेळी हे गॅझेट चांगले लोकप्रिय झाले होते. 1990 च्या दशकात अनेकांकडून पेजरचा वापर करण्यात आला होता विशेषतः उद्योजक, डॉक्टर आणि आपत्कालीन सेवेत असणारे व्यक्ती या तंत्रज्ञानाचा वापर करत होते. ही सेवा त्या काळात सुद्धा महाग होती. पेजर डिवाइस रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून मेसेज पाठवता येतो आणि रिसिव्ह करता येतो. पेजर सिस्टमला काही प्रकरणांमध्ये आधारित सेल्युलर नेटवर्कपेक्षा अधिक विश्वासार्ह बनवू शकते. ज्यामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीचा समावेश असू शकतो.

पेजर हॅक होऊ शकतो का? 

पेजरची प्रणाली जास्त मजबूत नाही. पेजर सिस्टम एनक्रिप्टेड नसते, त्यामुळे त्याला असलेला डेटा कॅप्चर करून तो हॅक करता येतो. यानंतर हॅकर (Hacker) त्यांच्या कमांड देऊ शकतात. हीजबुल्लाह (Hezbollah) चे अतिरेकी आपले लोकेशन समजू नये म्हणून पेजरचा वापर करत होते. परंतु आता तेच पेजर (Pager) त्यांच्यासाठी धोक्याचं ठरलं आहे. पेजरच्या तुलनेत मोबाईल प्रणाली प्रगत आणि आधुनिक आहे. पेजर पेक्षा मोबाईल हॅक करणं जास्त कठीण आहे. फोन हॅक करणे हे त्याचे ऑपरेटिंग सिस्टम (Operating System) आणि सेक्युरिटी सिस्टमवर (Security System) सुद्धा अवलंबून असते. अँड्रॉइड पेक्षा आयओएस अधिक सुरक्षित मानले जाते. पेजरपेक्षा मोबाईल जास्त सुरक्षित आहे परंतु मोबाईल हॅक होणार नाहीच, असे म्हणणे चुकीचे ठरू शकते.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss