spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ICC वुमन्स टी 20 वर्ल्डकप वेळापत्रक जाहीर; भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने

भारतीय महिला संघाचा पहिला सामना हा ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ येत्या ६ ऑक्टोबरला आमनेसामने असणार आहे.

आयसीसी (ICC) वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा याआधी बांगलादेशमध्ये होणार होती. पण बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी राजकीय घडामोडी झाल्या आणि तिथले सर्व चित्रच बदलले. बांगलादेशमधील राजकीय स्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे तिथे स्पर्धा आयोजित करणे कठीण होऊन बसले असते. त्यामुळे आयसीसीने ही स्पर्धा UAE मध्ये भरवण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा शारजाह क्रिकेट स्टेडियम आणि दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहे.

आता या स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ३ ऑक्टोबरला बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे. तर भारतीय महिला संघाचा पहिला सामना हा ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ येत्या ६ ऑक्टोबरला आमनेसामने असणार आहे. या स्पर्धेतील एकूण २३ सामने होणार असून अंतिम सामना २० ऑक्टोबरला होण्याचे जाहीर झाले आहे.

आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धावेळापत्रक:

  • ३ ऑक्टोबर, गुरुवार, बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह, दुपारी २ वाजता
  • ३ ऑक्टोबर, गुरुवार, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजाह, संध्याकाळी ६ वाजता
  • ४ ऑक्टोबर, शुक्रवार, साऊथ आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई, दुपारी २ वाजता
  • ४ ऑक्टोबर, शुक्रवार, इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, संध्याकाळी ६ वाजता
  • ५ ऑक्टोबर, शनिवार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजाह, दुपारी २ वाजता
  • ५ ऑक्टोबर, शनिवार, बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजाह,संध्याकाळी ६ वाजता
  • ६ ऑक्टोबर, रविवार, इंडिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई, दुपारी २ वाजता
  • ६ ऑक्टोबर, रविवार, वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई, संध्याकाळी ६ वाजता
  • ७ ऑक्टोबर, सोमवार, इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका, शारजाह, संध्याकाळी ६ वाजता
  • ८ ऑक्टोबर, मंगळावर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह, संध्याकाळी ६ वाजता
  • ९ ऑक्टोबर, बुधवार, साऊथ आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई, दुपारी २ वाजता
  • ९ ऑक्टोबर, बुधवार, इंडिया विरुद्ध श्रीलंका, दुबई, संध्याकाळी ६ वाजता
  • १० ऑक्टोबर, गुरुवार, बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजाह, संध्याकाळी ६ वाजता
  • ११ ऑक्टोबर, शुक्रवार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई संध्याकाळी ६ वाजता
  • १२ ऑक्टोबर, शनिवार, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजाह, दुपारी २ वाजता
  • १२ ऑक्टोबर, शनिवार, बांगलादेश विरुद्ध साऊथ आफ्रिका, दुबई, संध्याकाळी ६ वाजता
  • १३ ऑक्टोबर, रविवार, इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह, दुपारी २ वाजता
  • १३ ऑक्टोबर, रविवार, इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह, संध्याकाळी ६ वाजता
  • १४ ऑक्टोबर, सोमवार, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, संध्याकाळी ६ वाजता
  • १५ ऑक्टोबर, मंगळवार, इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई, संध्याकाळी ६ वाजता
  • १७ ऑक्टोबर, गुरुवार, सेमी-फायनल १, दुबई, संध्याकाळी ६ वाजता
  • १८ ऑक्टोबर, शुक्रवार, सेमी-फायनल २, शारजाह, संध्याकाळी ६ वाजता
  • २० ऑक्टोबर, रविवार, फायनल, दुबई, संध्याकाळी ६ वाजता
हे ही वाचा:

Lalbaugcha Raja Visarjan 2024: ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Hezbollah Pager Blasts: पेजर म्हणजे नेमकं काय? पेजरला हॅक करता येतं का?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss