spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कृष्ण पक्षातील तिथीपासून पितृपक्षाची सुरुवात; श्राद्धासंबंधी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

पितृपक्षाच्या काळात लोक तर्पण, पिंड, श्राद्ध इत्यादी विधी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी करतात. हा पितृपक्ष १५ दिवस चालतो. पितृपक्षात श्राद्ध विधीने आपले पितर प्रसन्न होतात, असे मानले जाते.

शुक्ल पक्षातील तिथी संपल्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन केले जाते. त्यानंतर कृष्ण पक्षातील तिथीपासून पितृपक्षाची सुरुवात होते. २०२४ चा पितृपक्ष आज बुधवार (दि. १८ सप्टेंबर) पासून सुरु झाला आहे. या पितृपक्षाची समाप्ती २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पितृपक्षाच्या काळात लोक तर्पण, पिंड, श्राद्ध इत्यादी विधी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी करतात. हा पितृपक्ष १५ दिवस चालतो. पितृपक्षात श्राद्ध विधीने आपले पितर प्रसन्न होतात, असे मानले जाते.

हिंदू धर्मात पितृपक्षात देह सोडणाऱ्या पितरांच्या आत्म्याला शांतीसाठी तर्पण अर्पण करण्याची परंपरा आहे यालाच श्राद्ध असे म्हणतात. १८ सप्टेंबरपासून म्हणजेच पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी श्राद्ध केले जाणार आहे. पितृपक्षातील श्राद्धासाठी तिथी, वार हा मध्यग्रहाच्या काळावर अवलंबून असतो. सर्व तारखा या अनुक्रमिक आहेत आणि पितृ विसर्जन १५ व्या दिवशी म्हणजे बुधवार २ ऑक्टोबर रोजी अमावस्या आणि अज्ञात तारखेच्या श्राद्धाने समाप्त होईल.

पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केलेल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे जीवनातील समस्यांपासून सुटका मिळते. असे मानले जाते की, जर श्राद्ध केले नाही तर आत्म्याला पूर्ण मोक्ष प्राप्त होत नाही. शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते. दुपारी १२ वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते. सूर्याला अग्नीचे उगमस्थानही मानले गेले आहे. तसेच यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात. श्राद्ध करण्यासाठी रोहिणी मुहूर्त चांगला मानला जातो. शास्त्रानुसार यावेळी केवळ कावळे, मुंग्या, गाय, देव आणि कुत्र्यांना अन्न अर्पण करावे असे सांगितले जाते.

हे ही वाचा:

Lalbaugcha Raja Visarjan 2024: ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Hezbollah Pager Blasts: पेजर म्हणजे नेमकं काय? पेजरला हॅक करता येतं का?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss