spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला: Balasaheb Thorat

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी टीका करत राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावरून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असतानाच आता भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. अनिल बोंडे यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा दाखला देत ‘राहुल गांधी जीभ छाटू नये पण जिभेला चटके द्यायला हवे,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी यावरून भाजपसह महायुतीवर जोरदार प्रहार केला आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या अधिकृत “X” अकाऊंटवरून भाजपसह महायुतीला लक्ष्य केले. शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर टीका करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत ते म्हणाले, “भाजपा आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राची सुस्कृंत राजकीय परंपरा संपवण्याचा उद्योग २०१४ ला सुरु झाला तो रोज खालच्या पातळीवर जात आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते दररोज महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासत आहेत आणि त्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या वाचाळवीरांना मूक पाठिंबा आहे हे अत्यंत धोकादायक आहे.”

“संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्या एवढेच दोषी आहेत. संजय गायकवाड, अनिल बोंडेंना तर जनता शिक्षा तर देईलच पण यांच्या कर्माची फळं यांना पाठीशी घालणा-या नेत्यांनाही भोगावी लागणार आहेत,” असे ते म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेरिका दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात आरक्षणविषयक प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ‘जेव्हा योग्य वेळ येईल, देशात समानता येईल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल. सध्या ती योग्य वेळ नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर विरोधकांकडुन चांगलीच आगपाखड करण्यात आली. भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींविरुद्ध आंदोलनेदेखील करण्यात आली. अश्यातच सत्ताधारी नेत्यांकडून राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह विधाने करण्यात आली होती. भाजप नेता आणि माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह (Tarwinder Singh Marwah) यांच्याकडून खुलेआमपणे राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देण्यात अली होती. तसेच राज्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी “राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. यानंतर अनिल बोंडे यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा दाखला देत ‘राहुल गांधी जीभ छाटू नये पण जिभेला चटके द्यायला हवे,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता अनिल बोंडे यांच्या वक्तव्याने या वादात आणखी भडका उडण्याची शक्यता आहे.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss