spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महिलांनो पार्लरमध्ये जाताय ? मग ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या…

जर तुम्ही ब्युटी केअर किंवा मेकअप आदी गोष्टींसाठी जात असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सौंदर्य खुलवण्याच्या नादात आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देऊन तुमच्या त्वचेला हानी पोहचू शकते.

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत, त्यामुळे महिला आपले सौंदर्य अजून खुलवण्यासाठी पार्लरमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. सणासुदीपासून ते लग्नसराईपर्यंत पार्लरमध्ये ट्रेडिंगपासून फेशियल, हेअरकट, मेकअपपर्यंत सर्व कामे केली जातात. त्यामुळे कधी ना कधी प्रत्येक स्त्रीला पार्लरमध्ये हे जावेच लागते. जर तुम्ही ब्युटी केअर किंवा मेकअप आदी गोष्टींसाठी जात असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सौंदर्य खुलवण्याच्या नादात आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देऊन तुमच्या त्वचेला हानी पोहचू शकते.

पार्लरमध्ये कोणतीही ब्युटी ट्रीटमेंट घेताना किंवा मेकअप करताना बहुतांश महिला या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नकळत महिलांच्या आरोग्याला तसेच त्वचेला हानी पोहचू शकते. या गोष्टी टाळण्यासाठी पार्लरमध्ये जाताना खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

पार्लरमध्ये गेल्यावर या गोष्टींपासून स्वच्छतेची काळजी घ्या:

  • मेक अप करताना अनेकदा ब्युटी प्रोडक्टची एक्सपायरी डेट संपलेली असते. अशावेळी पार्लरमध्ये गेल्यावर कोणत्याही प्रोडक्टची डेट एक्स्पायर न झाल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचेला होणाऱ्या समस्येपासून दूर राहू शकता.
  • एकाच दिवशी पार्लरमध्ये मेकअप किंवा अन्य त्वचेच्या ट्रीटमेंट घेण्यासाठी अनेक महिला या येत असतात. अशा परिस्थितीत ब्रश खूप घाणेरडे होतात. तोच ब्रश दुसऱ्याच्या चेहऱ्यावर साफ न करता वापरल्याने त्वचेची ऍलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या संवेदनशील त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.
  • पुरुषांचे सलून असो किंवा महिलांचे, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छतेची काळजी घेणे. बहुतेक पार्लरमध्ये बऱ्याच ग्राहकांना एकच टॉवेल वापरण्यास देतात. एकमेकांचा टॉवेल वापरल्यास त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. अशावेळी चेहरा किंवा त्वचेच्या कोणत्याही भागाला पुसताना टिश्यू पेपरचा वापर करावा.
  • तसेच पार्लरमध्ये बहुतेक कामे फेशियल, थ्रेडींग, वॅक्सिंग, मॅनिक्युअर, पेडिक्यूयर केली जातात. अशा परिस्थितीत धाग्याची स्वच्छता, पाण्याचे टब आणि त्यात वापरण्यात येणारी उपकरणे तसेच फेशियल करताना हातांची स्वच्छता याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:

कृष्ण पक्षातील तिथीपासून पितृपक्षाची सुरुवात; श्राद्धासंबंधी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी 

महिलांनो पार्लरमध्ये जाताय ? मग ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss