spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Samsung Galaxy F05: सॅमसंग कंपनीने लाँच केलं ‘हे’ नवीन मॉडेल इतक्या कमी किंमतीत; कसा मिळेल ग्राहकांकडून प्रतिसाद ?

Samsung Galaxy F05: सॅमसंग कंपनीने केलं नवीन Samsung Galaxy F05 मॉडेल लाँच. सॅमसंगने Samsung Galaxy M05 नंतर आता Samsung Galaxy F05 लाँच केला आहे. या नवीन सॅमसंग मॉडेलला ६.७ इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच MediaTek Helio G85 प्रोसेसरसह ४GB RAM व ६४GB स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये ५०MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy F05 ची ५०००mAh ची बॅटरी २५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy F05 ची किंमत काय ? (What is the price of Samsung Galaxy F05?)
Samsung Galaxy F05 स्मार्टफोनमध्ये ४GB RAM आणि ६४GB स्टोरेज देण्यात आला आहे. Samsung Galaxy F05 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आला आहे. हे एकमेव मॉडेल अवघ्या ७९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनची विक्री २० सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट (Flipkart) वर लाइव्ह होईल.

Samsung Galaxy F05चे इतर फीचर्स (Other Features of Samsung Galaxy F05)
Samsung Galaxy F05 फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५०MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर २MP चा डेप्थ सेन्सर देखील मिळतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८MP चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. पावर बॅकअपकरिता कंपनीनं फोनमध्ये ५०००mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. परंतु कंपनीकडून फोनच्या बॉक्समध्ये चार्जेर दिलेला नाही. चार्जिंगसाठी फोनमध्ये यूएसबी सी-टाइप केबल मिळते. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन बेसिक कनेक्टव्हिटी फीचर्ससह आला आहे. या फोनमध्ये LCD HD+ डिस्प्ले दिला गेला आहे. त्याच बरोबर ४GB रॅम व ६४GB स्टोरेज देण्यात आली आहे पण फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येईल.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss