spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shivsena UBT MP’s Disqualification: Sanjay Dina Patil यांची खासदारकी धोक्यात, नेमकं घडलं तरी काय?

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) गटाने ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर भाजप (BJP) कडून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली होती. उद्धव ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा 29 हजार 800 मतांचा फरकाने पराभव केला होता. लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले. त्यावेळी एक लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या हातून निसटला. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) तर शिंदेंकडून रवींद्र वायकर (Ravindra Waikar) अशी लढत होती. अगदी चुरशीच्या निकालात शिंदेंनी मतदारसंघ बळकावला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. अशातच, आता ठाकरेंच्या निवडून आलेल्या खासदाराच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्याने संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून दिली आहे. शहाजी थोरात यांनी संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली आहे. या प्रकरणाबाबत मिहीर कोटेचा यांच्यासह अन्य उमेदवारांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहे. भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि अन्य उमेदवारांना समन्स बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबई मतदार संघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील निवडून आले. न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने या निवडणुकीच्या याचिकेची दखल घेऊन पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि अन्य उमेदवारांना समन्स बजावून याची केवळ भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss