spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गायक हिमेश रेशमियावर कोसळला दुःखाचा डोंगर, ८७ वर्षी वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाच्या वडिलांचे काल १८ सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. हिमेश रेशमियाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये उलथापालथ घडवून आली आहे.गायकाचे वडील विपिन रेशमिया (Vipin Reshammiya) हे संगीत दिग्दर्शक होते. काल १८ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांना मुंबईमधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, याठिकाणीच त्यांचे निधनं झाले.

अभिनेता,गायक हिमेश रेशमियासाठी त्यांचे वडील गुरुस्थानी होते. विपिन रेशमिया यांचे संगीत मंत्रमुग्ध करून टाकते. त्याने सलमान खानच्या चित्रपटाला देखील संगीत दिले आहे. गायक, अभिनेता हिमेश आणि अभिनेता सलमान खान त्यांचे नाते खूप चांगले आहे. सलमानखा ने हिमेश रेशमियाचे संगीत ऐकले होते ते संगीत सलमानला फार आवडले होते. यामुळे भाईजान ने हिमेशला “प्यार किया तो डरना क्या” या चित्रपटामध्ये संगीत देण्याची संधी दिली. हिमेश रेशमियाने सलमान खानच्या अनेक चित्रपटाना उत्कृष्ट संगीत दिले आहे. हिमेश रेशमिया वयाच्या ६ व्या वर्षांपासून वडिलांचे संगीत ऐकत होते,संगीताचे धडे त्याने विपिन यांच्याकडूनच गिरवले होते. एका शोवर हिमेश रेशमिया बोला होता की, “माझ्या वडिलांनी गायक किशोर कुमार आणि लता मंगेशकर त्यांच्या सोबत एक गाणे केले होते पण ते गाणे कधीही रिलीज झाले नाही.” अशी खंत त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. हिमेशची संगीतातील ओढ पाहूनच विपिनी रेशमिया यांनी त्यांच संगीतकार होण्याचं स्वप्न मागे सोडलं होत. एक मुलाखतीमध्ये ते म्हणाले की हिमेशला लहानपणापासून संगीतामध्ये कल होती. हिमेशची संगीताची आवड पाहूनच मी माझं संगीतकार होण्याचं स्वप्न मागे टाकलं होत असं ते म्हणाले होते.

अशी माहिती समोर आली आहे की, हिमेश यांचे वडील विपिन रेशमिया यांना श्वास घेताना त्रास होत होता. आणि याशिवाय ते वृद्धापकाळातील आजारांशी ते झगडत होते. विपिन यांच्या पार्थिवावर १९ सप्टेंबर रोजी जुहू याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

 
 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss