spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या तक्रारीवर Devendra Fadnavis यांचे कठोर निर्देश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पॅन कार्ड जिहादच्या तपासाचे आदेश दिले आहेत. मुंबई भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या तक्रारीवर फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना बनावट पॅनकार्डची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईच्या उपनगर मालाड (Malad) पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मालवणी परिसरात बनावट पॅन कार्डचे पुरावे भाजप नेते आचार्य पवन त्रिपाठी यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, अनेक मुस्लिम बहुल भागांमध्ये लोकसंख्येपेक्षाही अधिक पॅन कार्ड असल्याची बातमी आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केले आहेत.

मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुराव्यांसह माहिती दिली आहे की, एका विशिष्ट समाजातील लोक मोठ्या प्रमाणात बनावट पॅन कार्ड तयार करत आहेत. त्यांनी दावा केला आहे की मुस्लिम बहुल भागांमध्ये शिताफीने हजारो लोकांनी बनावट पॅन कार्ड तयार करून घेतले आहेत. काही आयकर विभागाच्या नोंदींमध्ये लोकसंख्येपेक्षाही अधिक पॅन कार्ड आढळून आले आहेत. त्रिपाठी यांचे म्हणणे आहे की, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा एक व्यक्ती एकापेक्षा अधिक पॅन कार्ड ठेवतो. बनावट पॅन कार्डचा वापर बेकायदेशीर व्यवहार आणि काळा पैसा वैध करण्यासाठी होण्याची शक्यता आहे. त्रिपाठी यांनी मोठ्या प्रमाणात बनावट पॅन कार्डप्रमाणेच बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड आणि आयुष्मान कार्ड तयार केले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आचार्य पवन त्रिपाठी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका व्यक्तीचे अनेक पॅन कार्ड असल्याचे पुरावे दिले आहेत. हा व्यक्ती मालाड विधानसभा क्षेत्रातील मालवणी परिसरातील आहे. त्रिपाठी यांनी या फसवणुकीचा सखोल तपास करून या टोळीचे भांडाफोड करण्याची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत आणि केंद्रीय तपास यंत्रणांना देखील तत्काळ सूचित करण्याचे आदेश दिले आहेत. आचार्य पवन त्रिपाठी यांचे म्हणणे आहे की, एका विशिष्ट समाजातील लोकांकडून अशा प्रकारे बनावट पॅन कार्ड बनवून पॅनकार्ड जिहाद सुरू आहे. त्रिपाठी यांच्या मते मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात होणाऱ्या या फसवणुकीच्या मागे कोणत्यातरी मोठ्या कटाची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss