spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदरमध्ये संपन्न

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्वाच्या आहेत त्यासाठी आतापासूनच काम करा.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC मेंबर व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, आमदार भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, जोजो थॉमस, महेंद्र घरत, दयानंद चोरघे, समीर वर्तक, मनोज शिंदे, अविनाश लाड, अनिकेत म्हात्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते.

https://youtu.be/YCLZFTD04zs?si=KhRJvXtl-cLT7uys

भाईंदर येथे पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महायुती सरकारला सत्तेचा अंहकार झाला आहे, सर्वसामान्य जनतेला गाडीखाली चिरडून टाकणारे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातवाईक आहेत. महायुतीचे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे, आजही वाड्या वस्त्यावर ५० खोके एकदम ओके, हे विसरले नाहीत. भ्रष्ट युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यालाच चार दिवसांनी सरकारमध्ये घेतले व तिजोरीच्या चाव्या दिल्या. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाऱ्यांनीच भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेत घेतले. भ्रष्टाचारावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्वाच्या आहेत त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊन मविआचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. आरोग्य विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, ऍम्ब्युलन्स खऱेदीत घोटाळा केला आहे. हे सरकार कमीशनखोर, खोकेबाज, धोकेबाज सरकार असून या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबईतील कोट्यवधी रुपयांची जागा अदानीला विकली जात आहे. भाजपा युती सरकारने महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना जीवघेण्या धमक्या देणाऱ्यांचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला तसेच आगामी निवडणुका लक्षात घेऊन कोकणात काँग्रेस पक्ष वाढवण्यावर भर द्या, जिद्दीने कामाला लागा व कोकणातून जास्तीत जास्त जागेवर विजय मिळवा असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

यावळी बोलताना विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदलले आहे. भाजप सरकारच्या काळात लोकांचे जगणे मुष्कील झाले आहे. त्यामुळे जनता त्रस्त आहे. जनतेला आता बदल हवा आहे. राज्यात सध्या काँग्रेसमय वातावरण आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार लोकापर्यंत पोहोचवा व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणा.

हे ही वाचा:

Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar?

 

लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? Salman Khanच्या वडिलांना अज्ञात महिलेकडून धमकी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss