spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम

हवामान बदलले की साथीचे आजार होण्याची शक्यता वाढते. यामध्ये सर्वात आधी जे लक्षण दिसते ते म्हणजे सर्दी. सर्दी होण्यामागचे कारण म्हणजे बदलते हवामान, धुळ, मातीची एलर्जी हे कारण आहे. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती हे सुद्धा यामागचचे कारण आहे. वातावरणात थंडावा वाढल्यानंतर काही लोकांना शिंकांचा त्रास होतो.

सर्दीची लक्षणे कोणती?
घसा खवखवणे,नाक बंद होणे, नाकाला खाज सुटणे,डोळयांची जळजळ होणे,डोकेदुखी आणि जडपणा , खोकला, शिंकणे, ताप येणे. पण सर्दीसाठी औषधे घेण्याऐवजी घरगुती उपाय केले तर शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. काही असे घरगुती उपाय आहेत, त्यामुळे शिंकांचा त्रास कमी होतोच पण सर्दीच्या लक्षणापासूनही आराम मिळतो. वारंवार शिंका येत असतील, तर यामागे एलर्जी सुद्धा एक कारण असू शकत. जास्तवेळ एसी मध्ये राहिल्यास ड्राय नोजचा त्रास होतो. त्यामुळे वारंवार शिंका येतात. सध्या काही असे घरगुती उपाय जाणून घेऊया,ज्यामुळे सर्दी आणि शिंकांच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते.

हळदीचे दूध एक ग्लास गरम दुधामध्ये दोन चमचे हळद टाकून प्या. यामुळे नाक बंद आणि घसा खवखवण्यापासून आराम मिळतो. नाकातून पाणी वाहणे थांबते. तुळशीचे सेवन करा, खोकला आणि सर्दी झाल्यास तुळशीची ८ ते १० पाने बारीक करून पाण्यात टाकून त्याचा रस तयार करा. लहान मुलांना सर्दी झाल्यास आले आणि तुळशीच्या रसाचे ६-७ थेंब मधात मिसळून चाटावे. हे ब्लॉक केलेले नाक साफ करणे आणि वाहणारे नाक थांबवणे या दोन्हीसाठी उपयुक्त आहे. वारंवार शिंका येत असतील किंवा सर्दी झाली तर रात्री झोपण्याआधी वाफ घ्या. सर्दीमुळे नाक कधीकधी सुजतं. गरम पाण्याच्या वाफेमुळे त्रास कमी होतो. सायनसमुळे जमा झालेला कफही निघून जातो. गरम पाण्यात लवंग,लसूनच्या पाकळ्या,मीठ, टाका. कारण त्यात एंटी बॅक्टेरियल गुण असतात. काळी मिरी काळी मिरी पावडर मधाबरोबर खाल्ल्याने सर्दीपासून आराम मिळतो आणि नाकातून वाहने कमी होते.

Latest Posts

Don't Miss