spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चैत्यभूमीवर जाऊन महामानव आंबेडकरांच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा..Naresh Mhaske यांचं Rahul Gandhi यांना पत्र

राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या भाष्यावरून आता सगळीकडे त्यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य ‘मोहब्बत की दुकान’ नसून शोषित वंचितांचे ‘दमन की दुकान’ असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी पत्रामार्फत केली आहे. नरेश मस्के यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवर राहुल गांधी यांना लिहिलेले पत्र शेअर केले आहे.

पत्रात काय लिहिले आहे?  

बरं झालं तुमच्या पोटातलं परदेशात का होईना पण ओठांवर आलं. तुमचं खरं स्वरूप उघड झालं. तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. दलित शोषित आणि वंचितांच्या पोटावर पाय देणाऱ्या सरंजामी बुटांचे दुकान आहे. अमेरिकेमध्ये तुम्ही जे उद्गार काढले त्यामुळे देशातला दलित तरुण आता खडबडून जागा होईल असा विश्वास वाटतो असे म्हणत नरेश मस्के यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र उगारले. चार घटका मनोरंजन एवढेच राहुल गांधी यांचे भारतीय राजकारणातले मोल आहे. चार्ली चॅप्लिन आणि जॉनी लिव्हर यांच्यासारख्या हास्य कलाकारांनी सुद्धा मान खाली घालावी अशी भाष्य तुम्ही संसदेमध्ये केली आहेत पण आरक्षणावर बोलून तुम्ही मर्यादा ओलांडली असल्याने हा पत्र प्रपंच करावा लागला असल्याचे नरेश मस्के यांनी म्हटले आहे.

आरक्षण देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जमेल तेवढा दुस्वास काँग्रेस मधील नेहरू समर्थकांनी तेव्हाही केला होता. पंडित नेहरू यांचे आरक्षणाबाबतचे विचार तुम्हाला परिचित असतीलच, नसतील तर ते वाचून घ्या. आपले पणजोबा, आजी, वडील, आई यांच्या पाऊलावर पाऊल टाकून तुम्ही आरक्षण विरोधी वाटचाल सुरू केली आहे. एवढेच म्हणता येईल. संविधान विरोधी आणि आरक्षण विरोधी नेता ही तुमची भविष्यात ओळख बनेल. याला ओळख म्हणायचे की बदनामी हे आता तुम्हीच ठरवा. जमेल तिथे तुमचा धिक्कार करण्याच्या शपथा आता दलित बांधव आणि भगिनी खात आहेत हे विसरू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली, तेव्हा दलितांना आरक्षणाची गरज असल्याचे नमूद करून आवर्जून तसा कायदा निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलल्याचे नरेश मस्के यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss