spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर

RG Kar Protest : 9 ऑगस्ट 2024 रोजी पश्चिम बंगाल येथील कोलकत्ता या ठिकाणी आरजीकर रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आणि देशभरातील निवासी डॉक्टरांनी न्यायाची मागणी करत संप पुकारले होते. चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस हा संप सुरू होता. 41 दिवसांनी हा संप मागे घेण्यात आला असून आता शनिवार 21 सप्टेंबर पासून सर्व डॉक्टर कामावर रुजू होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी या डॉक्टरांच्या शिष्ट मंडळाची आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची चर्चा झाली होती. त्यानंतर ज्युनियर डॉक्टरांच्या बैठकीत संप मागे घेण्याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. आज 20 सप्टेंबर रोजी हा संप जाहीररित्या मागे घेतला जाईल आणि शनिवार म्हणजेच 21 सप्टेंबर पासून सर्व डॉक्टर कामावर रुजू होणार आहेत.

कोलकत्ता येथील आरजीकर रुग्णालयात महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला. मात्र, आरोपीचा क्रूरपणा इतका टोकाला गेला होता की, त्याने डॉक्टरची हत्या केली. या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमाचा निषेध नोंदवत आणि पीडितेला न्याय द्यावा, यासाठी ज्युनियर डॉक्टरांनी संप पुकारला होता. हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेले होते. डॉक्टरांची सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांनी कामावर परत यावे, यासाठी सुप्रीम कोर्टाकडून आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात आले होते. सरकारकडून संप केलेल्या डॉक्टरांशी सतत चर्चा करण्यात येत होती. मात्र न्यायाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, अशा भूमिकेवर डॉक्टर ठाम होते. शेवटी बरीच चर्चा आणि बैठक घेतल्यानंतर सुरक्षेच्या मुद्द्यावर ठोस उपाययोजनांची खात्री पटल्यावर एक महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू असलेला हा संप मागे घेण्याचा निर्णय डॉक्टरांकडून घेण्यात आला आहे. त्याआधी आज म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी दुपारी कोलकाता येथील स्वास्थ्य भवन ते सीबीआय कार्यालयापर्यंत डॉक्टरांकडून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss