spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महापुरुषांची स्मारके आपल्या सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील- CM Eknath Shinde

बुलढाणा नगर परिषदेमार्फत बुलढाणा (Buldhana) शहरातील विविध भागात संत आणि महापुरुषांचे पुतळे स्थापित  करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. शहरात उभारण्यात आलेले संत, महापुरुष यांची स्मारके आपल्या सर्वांना नेहमीत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील. ही स्मारके ऊर्जा देण्यासोबतच भावी पिढीला समतेचा आणि मानवतेचा संदेश देतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील संत-महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत आणि महापुरुषांची स्मारके प्रेरणा व उर्जा देणारे ठरतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील शिवरत्न शिवा काशिद, संत गाडगे बाबा तर जयस्तंभ चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Dharmveer Chhatrapati Sambhaji Maharaj), राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) व माता रमाबाई, महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) व सावित्रीबाई फुले, संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि संत रविदास महाराज, शासकीय विश्रामगृह जवळील वसंतराव नाईक, राजर्षी शाहू महाराज (Rajshree Shahu Maharaj), महात्मा बसवेश्वर महाराज (Mahatma Basweshwar Maharaj), तहसील चौकातील नरवीर तानाजी मालूसरे (Narveer Tanaji Malusare) आणि एडेड हायस्कूल चौकातील नरवीर बाजीप्रभू देशपांडे, कारंजा चौकातील अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्याचे, जैन समाजाच्या स्मारकाचे तसेच भगवान वीर एकलव्य महाराज (Bhagwan Veer Eklavya Maharaj), महर्षी वाल्मिकी ऋषी, शहिद जवान युध्द स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी अनावरण कार्यक्रमास केंद्रीय आयुष व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav), आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad), संजय रायमूलकर, डॉ. राजेंद्र शिंगणे, श्वेता महाले, बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss