spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Narendra Modi महाराष्ट्रात येतात – जातात, पण आपण कसलं उद्घाटन केलं हेच त्यांना माहीत नसतं: Sanjay Raut

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (शुक्रवार, २० सप्टेंबर) महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी पीएम विश्वकर्मा योजनेच्या (PM Vishvakarma Yojana) लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील. पंतप्रधानांच्या या दौऱ्यावरून आता राजकीय चर्चांना सुरुवात झाली असून शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर मोठे भाष्य केले आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जोरदार हल्लबोल केला. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येतात-जातात… पण आपण कसलं उद्घाटन केलं हेच त्यांना माहीत नसतं, अश्या खोचक शब्दांत संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

यावेळी संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येतात – जातात. पण आपण कसलं उद्घाटन केलं हेच त्यांना माहीत नसतं… भाजपाने घेतलेल्या भूमिकांमुळे महाराष्ट्र तळमळीत झाला आहे. अस्थिर झाला आहे. औद्योगिकदृष्ट्या कमजोर झालेला आहे. याचं सर्वस्वी कारण म्हणजे नरेंद्र मोदी येतात फिती कापून जातात. इथल्या उद्यपंगांचं काय? आजही एक मोठा उद्योग गुजरातला गेलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती गंभीर आहे. नरेंद्र मोदींनी इथे येऊन उद्घाटन करण्यापेक्षा महाराष्ट्रातील उद्योगधंदे जे बाहेर जातात ते थांबविण्यासाठी निर्णय घ्यावेत,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदी काळ जम्मू काश्मीर मध्ये गेले. जम्मू मध्ये त्यांनी जम्मू आणि काश्मीरराज्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा अशी घोषणा केली. कारण की तिथे जनतेच्या भावना त्या होत्या. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेसाठी निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योग पुन्हा महाराष्ट्रात द्या हि आमची मागणी आहे,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदीं यांच्या उपस्थितीत होणार विविध उपक्रमांचा शुभारंभ

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अमरावती येथे प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपारेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणीही होणार आहे. पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा शुभारंभ करतील. तसेच, पंतप्रधानांच्या हस्ते “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा” शुभारंभ होणार आहे. या योजनेंतर्गत, महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील नवउद्यमी स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मदत दिली जाईल.

हे ही वाचा:

 
 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss