spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Watch Video : Navra Maza Navsacha 2 च्या भारूडाची तुफान चर्चा…, “५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी…”

आता हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशातच आता हा चित्रपट वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आहे. चित्रपटातील सध्याचे राजकारण, परस्थितीवर भाष्य करणारे एक भारुड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Navra Maza Navsacha 2 : नवरा माझा नवसाचा’ हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमातील गाणीही प्रचंड हिट ठरली होती. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेडे केले होते. या चित्रपटातील कथा, संवाद आणि कलाकारांचा अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या चित्रपटातील कॉमेडी पाहून चाहते खळखळून हसले. प्रत्येक कलाकारांनी या चित्रपटामध्ये आपली भूमिका उत्कृष्ट बजावली होती. तर एसटीमधल्या सगळ्याकलाकारांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. आता तब्बल १९ वर्षांनंतर या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते मोठ्या प्रमाणत या चित्रपटाची वाट पाहत होते. चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशातच आता हा चित्रपट वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आहे. चित्रपटातील सध्याचे राजकारण, परस्थितीवर भाष्य करणारे एक भारुड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शुक्रवारी ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र या चित्रपटातील एका भारुडाविषयी जोरदार चर्चा सुरु झाली. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या भारुडामधील काही शब्दांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटामध्ये एका पुढाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ जाधवने ट्रेनमध्ये हे भारुड सादर केलं आहे. व्हायरल होत असलेल्या भारुडामध्ये सिद्धार्थ जाधव ट्रेनच्या डब्ब्यामध्ये गणरायाला भारूडातून साकडं घालताना दिसत आहे. यावेळी सिद्धार्थ जाधव “देवा जर का तू मला पावला, सत्ताधारी खासदारकी लाभली मला, मुकूट घालीन ५० खोक्यांचा तुला,” असं म्हणतो. यावर ‘हे नवस बोलत आहेत की लाच देत आहेत?’ असा प्रश्न स्वप्नील जोशी करतो. “जनतेचं भलं कराया, विरोधी पक्ष फोडाया, बुद्धी द्यावी गणराया,” अशीही मागणी सिद्धार्थ जाधव करतो. यावर सचिन पिळगावकर अशी बुद्धी गणराय देत नाही,” असं म्हणतात. यावेळी कार्यकर्त्यांचे भलं कोण करणार असं अशोक सराफ म्हणतात. त्यावर कार्यकर्त्यांचे भले केले तर साहेबांच्या सतरंज्या कोण उचलणार असं सचिन पिळगावर म्हणतात. त्यावर साहेबांच्या सतरंज्या उचलणं आमचं भाग्य आहे, असं जयवंत वाडकर म्हणतात.

 तर राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर या भारूडातून मार्मिक भाष्य केलं असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. या भारूडातून गेल्या काही वर्षात राज्यात सुरु असलेल्या पक्षांतर, पक्ष फोडीचे राजकारण यावर योग्य भाष्य करण्यात आल्याचे सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. तर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठा इतिहास रचला आहे. सिनेमा पाहाण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल्ल केली आहेत. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार ‘नवरा माझा नवसाचा २’ ने पहिल्याच दिवशी दोन कोटी रुपयांची कमाई केली. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

चित्रपटाची कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.

हे ही वाचा:

घटस्फोटाची घोषणा करत HARDIK PANDYA यांनी केले चाहत्यांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss