spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Eknath Khadse यांना नेमकं जायचं तरी कुठे? पक्षप्रवेशावर भाजपाचा काय निर्णय असणार?

लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आपला भाजपात पक्ष प्रवेश झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी पक्षातच राहतील, अशी माहिती शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आपला भाजपात पक्ष प्रवेश झाला होता. मात्र, त्यानंतर भाजपानं यावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, किंवा याबाबतची घोषणाही केली नाही, त्यामुळे भाजपाला फुली मारत आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं खडसे यांनी सांगितल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. शिवस्वराज्य यात्रेसाठी जयंत पाटील जळगाव दौऱ्यावर असताना पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.

एकनाथ खडसे यांनी आपल्या पुढील भूमिकेबाबत पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, भाजपात आपल्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांचा विरोध आहे. भाजपात प्रवेश झाल्यानंतरही भाजपानं याबाबतची घोषणा केली नाही. भाजपात जाण्यामागे आपली काही कारणं होती, मात्र भाजपाकडून केलेल्या या वागणुकीवरून हे स्पष्ट होतं की, भाजपाला आपली गरज नाही. त्यामुळे भाजपा नाही तर आपण आपला मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात राहू, या पक्षातून आपण बाहेर पडलो नाही आणि आपण आमदारही आहोच. पूर्वीचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी २०२० मध्ये भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आणि लोकसभेपूर्वी त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, केंद्रीय नेतृत्वांनी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असेल. एकनाथ खडसे भाजपात आल्यास त्यांचं स्वागतच आहे, त्यांच्या येण्याने पक्षाचं बळ वाढेल, मात्र खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आपण काही बोलू शकत नाही, याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व करेल आणि गणोशोत्सवानंतर यावर निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे गणेशोत्सवानंतर खडसे यांच्या पक्षप्रवेशावर भाजपाचा काय निर्णय असेल आणि विधानसभा निवडणुका तोंडावर ठेपल्या असताना खडसे कोणत्या पक्षात राहतील हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हे ही वाचा:

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज; ‘देवा भाऊ देवा भाऊ’…या गाण्याने प्रचाराचा प्रारंभ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा, काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss