spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ईडीच्या आरोप पत्रामुळे होणार संजय राऊतांच्या अडचणीत वाढ

पण ईडीच्या आरोप पत्रामध्ये राऊतांचाही यामध्ये थेट सहभाग होता असे म्हटले गेले आहे.

पत्रचाळ प्रकरणी ईडीच्या (ED Office) ताब्यात असणाऱ्या संजय राऊतांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. ईडीने संजय राऊतांना मिळणाऱ्या जामिनाला केवळ विरोधच केला नाही तर त्यांच्यासमोरील अडचणीही वाढवल्या आहेत. संजय राऊतांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने (Court) ईडीला (ED Office) दिले होते. यालाच उत्तर म्हणून ईडीने आता संजय राऊतांविरोधात एक आरोप पत्र दाखल केले. त्यामुळे आता याचा राऊतांच्या कोठडीवर काय परिणाम होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आतापर्यंत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांची केवळ चौकशी सुरु होती. पण ईडीच्या आरोप पत्रामध्ये राऊतांचाही यामध्ये थेट सहभाग होता असे म्हटले गेले आहे. त्यामुळे ज्या दिवशी राऊतांना दिलासा मिळेल असे चित्र होते त्याच दिवशी त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांच्या विरोधात दोष आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता चौकशी सुरु असतानाच त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे यापुढे राऊतांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचेच चित्र आहे. पीएमएलए कोर्टांमध्ये हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात सरकारने केला जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीचा परवाना रद्द

The journey of PM Modi : मोदींचा चहावाला ते पंतप्रधान पर्यंतचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss