spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून Sanjay Raut यांचा महायुती सरकारवर निशाणा

राज्य सरकारने शुक्रवारी (२० सप्टेंबर) मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक (Mumbai University Sinate Election) दुसऱ्यांदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University) त्याचे परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु काल (शनिवार, २१ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत मोठा निर्णय देत सरकारचा हा निर्णय रद्द करत त्वरित निवडणुका घेण्याचे आदेश दिले. याबाबत शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून राज्यातील महायुती सरकारवर (Mahayuti Government) जोरदार हल्लाबोल केला.

देशभरात ‘एक देश, एक निवडणुक’ चे बिगुल केंद्र सरकारकडून वाजवण्यातयेत आहे. मंत्रिमंडळाने तसा प्रस्तावही पास केला असून आता संसदेत याबाबत चर्चा होणार आहे. असे असतानाच विरोधकांनी मात्र याला कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे. अश्यातच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाही प्रलंबित राहिल्या असून संजय राऊत यांनी आज (रविवार, २२ सप्टेंबर) यावर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, “कोर्टाचा आदेश आहे की या राज्यामध्ये निवडणुका घ्यायचाच नाहीत. हे धोरण या मिंधे सरकारने अवलंबले आहे, कारण निवडणुका घेतल्या की लोकं जोडे मारतील आणि प्रत्येक ठिकाणी पैशाचा वापर करुन मतं विकत घेता येत नाहीत. ही सिनेटची निवडणूक, इकडचा मतदार हा सुशिक्षित, पदवीधर त्यामुळे हा विकत घेतला जाऊ शकत नाही, जिथे मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही तिथे मिंधे, अजित पवार किंवा फडणवीस हे निवडणूक घ्यायला घाबरतात, लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार आहे. निवडणूकीला २४ तास असताना आपण हरतो हे पटल्यावर ही निवडणूक रद्द केली, पण मुंबईच्या उच्च न्यायालयाने चपराक लगावली व निवडणूकांचा मार्ग मोकळा केला.”

“मी असे ऐकतो आहे मुंबई विद्यापीठातील प्रशासन कोर्टात जाऊन निवडणुकीवर स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ विद्यापीठावर राजकीय व त्या विद्यापीठाच्या मदर बॉडीचा हा दबाव आहे, पण निवडणुका होतील आणि सर्व जागा आमच्या युवासेनेचे लोकं जिंकतील. अशाच पद्धतीने त्यांनी अजून बिएमसी निवडणुका घेतल्या नाहीत, शेवटी राष्ट्रपतींना पण याचा त्रास झाला, जेव्हा त्या पुण्यात आल्या तेव्हा रस्त्यावरचे खड्डे इतके होते की त्यांनी दिल्लीत जाऊन पुणे मनपा आयुक्तांना पत्र लिहिले होते,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

गृहविभागाकडून आडकाठी का आणली जातेय? Combine परीक्षेचा मार्ग खुला करा, अन्यथा पुन्हा एकदा….Rohit Pawar यांचा गृहविभागाला इशारा राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली; Congress शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन, काँग्रेस नेते Rahul Gandhi यांच्या जीवाला धोका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss