spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

यंदाच्या पितृपक्षात बनवा मलईदार पारंपरिक तांदळाची खीर

पितृपक्षाच्या नैवेद्याच्या ताटात अनेक पदार्थ असतात पण त्यात तांदळाच्या खीरीला विशेष महत्त्व आहे. जर तुम्हीसुद्धा या पितृपक्षात तांदळाची खीर (Tandalachi Kheer) बनवत असाल तर अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक खीर रेसिपी बनवू शकता.

सध्या पितृपक्ष सुरु झाला असून या दिवसांमध्ये पितरांचे स्मरण केले जाते. श्राद्धाच्या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. पितृपक्षाच्या नैवेद्याच्या ताटात अनेक पदार्थ असतात पण त्यात तांदळाच्या खीरीला विशेष महत्त्व आहे. जर तुम्हीसुद्धा या पितृपक्षात तांदळाची खीर (Tandalachi Kheer) बनवत असाल तर अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक खीर रेसिपी बनवू शकता. चला तर मग पारंपरिक तांदळाची खीर रेसिपी कशी बनवायची हे पाहूयात.

तांदळाची खीर

साहित्य:

  • तांदूळ – १/२ कप
  • दूध – १ लिटर
  • साखर – १ कप (आवडीनुसार)
  • वेलची पावडर – १/२ चमचा
  • तूप -2 चमचा
  • सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता) – आवडीनुसार
  • केशर – २-३ काड्या (पर्यायी)

कृती:

  • प्रथम तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या, नंतर त्यातील पाणी निथळून ते एका कापडावर हवेखाली वाळायला ठेवा.  तांदूळ २ दिवस चांगले सुकू द्या.
  • तांदूळ चांगले वाळले की मिक्सरमधून रव्यासारखे जाडसर बारीक करून घ्या.
  • एका पातेल्यात तूप गरम करून, तांदूळ हलकेसर परतून घ्या. परतताना तांदूळ हलका गुलाबी होईपर्यंत परता.
  •  दुसऱ्या भांड्यात दूध गरम करत ठेवा. दूध उकळी आल्यावर, त्यात परतलेले तांदूळ टाका.
  • मंद आचेवर तांदूळ शिजवायला ठेवा. दूध कमी होईपर्यंत आणि तांदूळ पूर्ण शिजेपर्यंत हलवत राहा.
  • तांदूळ पूर्ण शिजल्यावर त्यात साखर टाका व हलवून घ्या. साखर विरघळल्यावर वेलची पावडर आणि केशर टाका.
  • सुका मेवा खीरीवर सजवण्यासाठी तूपात थोडेसे परतून घ्या आणि खीरीत घाला.
  • खीर ५-१० मिनिटे बाजूला ठेवून द्या, जेणेकरून ती घट्ट होईल.
  • तांदळाची खीर गरमागरम किंवा गार करून खावू शकता.

दहावी उत्तीर्ण इच्छुकांना सुवर्णसंधी; ITBP मध्ये चालक पदाची भरती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss