spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महायुतीत आल्यास Prakash Ambedkar यांना मंत्रिपद देऊ, Ramdas Athawale यांची ‘वंचित’ ला मोठी ऑफर

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने आता सर्वच पक्षांनी जोर लावल्याचे पाहायलाच मिळत आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जोरदार लढत होणार असल्याच्या चर्चा असतानाच वंचित बहुजन आघाड़ीनेही (Vanchit Bahujan Aghadi) तिसऱ्या आघाडीचा पर्याय राज्यातील मतदारांसमोर ठेवला आहे. अश्यातच, आरपीआय आठवले (RPI Athawale camp) गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी याबाबत मोठे भाष्य केले असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना महायुतीत येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, महायुतीत आल्यास प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपद देऊ, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे.

रामदास आठवले यांनी आज (रविवार, २२ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी भाष्य केले. आंबेडकरांना थेट मंत्रिपदाची ऑफर देत रामदास आठवलेंनी नवा डाव खेळल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाल्या असून आठवलेंची ऑफर स्वीकारून वंचित महायुतीत सामील होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीला आजवर हवं तस यश मिळालं नाही आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महायुती मध्ये यावं. ते जर महायुतीत आले तर त्यांना मंत्री पद मिळेल.माझं मंत्रीपद मी त्यांना देईन किंवा त्यासाठी प्रयत्न करेन. तीनही पक्षाने त्यांच्या कोट्यातील चार चार जागा द्याव्यात तर आम्ही १२ जागा लढवू. १९९० मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्या सोबत असते तर तेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं असते. मी बाबासाहेबांचा पक्ष सोडून वंचित मध्ये जाणार नाही, त्यांनी यायला काही हरकत नाही आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव बदलायला नको होतं,” असे ते यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “मी ज्या सरकार मध्ये आहे ते सरकार पाच वर्ष चालणार आहे. हे सरकार पडणार या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. एका पक्षाला बहुमत न मिळाल्यावर अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार यापूर्वी बनवली आहेत. विदर्भ भाजपचा बालेकिल्ला असताना देखील कमी जागा मिळाल्या, ज्या पद्धतीने विदर्भात विजय मिळायला हवा होता त्या पद्धतीने मिळाला नाही. महायुतीला ४० जागा मिळतील अशी अपेक्षा होती मात्र संविधान बदलणार अशा खोट्या नेरेटिव्ह मुळे ते शक्य झालं नाही. नरेंद्र मोदीच नव्हे तर कोणीच संविधान बदलवू शकत नाही. महाविकास आघाडी सत्तेत आली तर सगळे जेल मध्ये गेले असते असे ते म्हणाले अशा पद्धतीने खोटा प्रचार केला,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून Sanjay Raut यांचा महायुती सरकारवर निशाणा

Raj Thackeray Vision Worli: Sandeep Deshpande हा राजकीयदृष्ट्या जागृत आणि अभ्यासू मुलगा, तो आमचा हिरा! ठाकरेंकडून देशपांडेंचे कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss