spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘आम्ही गुजरात पाकिस्तान नाही…’, वेदांत-फॉक्सकॉन वादावरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेदांत-फॉक्सकॉन प्रकरण खूप गाजत आहे. महाराष्ट्रातून ( Maharashtra) वेदांत प्रकल्प गुजरातला (Gujarat) हलवल्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्र सरकारला चांगलेच घेरल्यायचे दिसून येत आहे. वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट प्रकल्प मिळविणारे गुजरात हे पाकिस्तान (Pakistan) नाही असा हल्लाबोल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला

“गुजरात हा पाकिस्तान नाही. तो आमचा भाऊ आहे. ही एक निरोगी स्पर्धा आहे. आम्हाला गुजरात, कर्नाटक, सगळ्यांच्या पुढे जायचे आहे,” असे फडणवीस एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले की, वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिल्यानंतरही हा वाद चिघळत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी स्वतः अनिल अग्रवाल (Anil Agarwal) यांची भेट घेतली आणि गुजरात कराराशी जुळवून घेण्यासाठी कंपनीला ‘टेलर-मेड’ पॅकेज ऑफर केले. ‘परंतु अनिल अग्रवाल म्हणाले की, युनिट गुजरातला हलवण्याचा निर्णय त्यावेळी अंतिम टप्प्यात होता’, असे फडणवीस म्हणाले. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय वेदांतने घेतल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

तुळशीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

सर्व विरोधी पक्षांनी मिळून एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारवर वेदांताचा तोटा झाल्याचा हल्लाबोल केला आहे. वेदांत फॉक्सकॉनचे युनिट पुण्याजवळ येणार होते, परंतु वेदांत-फॉक्सकॉनने १३ सप्टेंबर रोजी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ज्यामुळे एक मोठा राजकीय वाद निर्माण झाला. महाराष्ट्रातील विद्यमान सरकार केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असून महाराष्ट्राच्या किंमतीवर गुजरातच्या विकासासाठी काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर महाराष्ट्राचे माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी १५ जुलै रोजी या प्रकल्पावर उच्चाधिकार समितीची बैठक झाली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकल्पाची घोषणा केली. हा प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याचे मीडिया आणि विधानसभेत सांगितले होते.

हे ही वाचा:

जाणून घ्या… बदाम खाण्याचे फायदे

PM Narendra Modi Birthday 2022: पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या ‘ या ‘ पाच निर्णयांमुळे देशात घडले मोठे बदल.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss