spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य १७ सप्टेंबर २०२२: क्रोध अनावर झालाच तर कदाचित …..

मेष :
स्वकर्तृत्वाने सामाज मनात आपले स्थान निर्माण कराल. न्याय व्यवस्थेवर विश्वास वृद्धिंगत होईल. अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. मित्र परिवाराकडून मिळालेल्या सहकार्यामुळे प्रगतीकडे वाटचाल कराल.

वृषभ :
पारिवारिक स्नेह संबंध सुधारण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना आज यश प्राप्त होईल. अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. काही काम करण्याचा विचार कराल परंतु, आगन्तुक व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. आपण घेतलेला निर्णय यशाकडे जाण्यास मदतगार ठरेल.

मिथुन :
आज स्नेही जनांचे सहवासात आनंदी जीवन जगाल. पुरातन वस्तूंची खरेदी आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायद्याची ठरेल. वडिलोपार्जित परंपरांचा सन्मान वाढेल अशा घटना घडतील. बदलत्या जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल.

कर्क  :
आपल्या निर्णयाला इतरांच्या अनुभवाची जोड द्याल तरच नुकसानाचा धोका टळू शकेल. घरातील साफसफाई करण्याचे काम ताबडतोबीने केले पाहिजे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्जाऊ रक्कम घेणे देणे याप्रकारचे व्यवहारात फसवणूक होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील उद्देशावर ठाम राहून आपल्या दिनक्रमाची आखणी करणे आवश्यक आहे.

सिंह   :
विनयशील वागण्याबद्दल तुमचे कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. जर तुम्ही कर्ज घेणार असाल तर ते आज मिळू शकते. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंदी आणि निवांत राहील. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्राच्या यात्रा कराल. गंगा स्नानाने आत्मिक समाधान लाभेल.

कन्या :
क्रोध अनावर झालाच तर कदाचित त्याचा तुम्हालाच नजिकच्या काळात पश्चात्ताप करावा लागेल. आजची गुंतवणूक बऱ्याच काळासाठी खूप फायदेशीर ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. आज  स्वतःला व्यर्थ खर्च करण्यापासून थांबवले पाहिजे . कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल.  आपली चूक मान्य करा.

तुला :
तुमचा सकारात्मक दृष्टिकोन कसा वाढेल याबाबत काळजी घ्या. उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमचे घरगुती कामकाज, जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील.

वृश्चिक :
व्यवसायातून आर्थिक उन्नती होईल.  तुम्हाला हीही काळजी घ्यावी लागेल की, आपण काही अवाजवी अथवा अनाठायी खर्च तर करीत नाही ना ? आजचा   दिवस उत्तम आहे. स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. तज्ज्ञ मंडळींचा सल्ला तुम्हाला फायद्याचा ठरेल. नवा कीर्तिमान स्थापन करण्यासाठी केलेला प्रयत्न आशा पल्लवित करील.

खजूर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ?

धनु :
तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु वातावरण बदलाने झालेल्या शारीरिक स्थिती आणि कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून गेलेलं जाल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल.

मकर :
तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ द्यायला हवा. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजच्या दिवशी अचूक संवाद साधणे हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल.

 कुंभ :
तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकावणे टाळा. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. तुमच्या कमजोरीचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

हे ही वाचा:

‘आम्ही गुजरात पाकिस्तान नाही…’, वेदांत-फॉक्सकॉन वादावरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

The journey of PM Modi : मोदींचा चहावाला ते पंतप्रधान पर्यंतचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss