spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘होम मिनिस्टर’ च्या शेवटच्या भागात पूर्ण झाली या अभिनेत्रीची इच्छा; ती सव्वा लाखाची पैठणी

आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर (Home Minister) ह्या कार्यक्रमाने आता अखेर निरोप घेतला आहे. निरोप घेण्याआधी झी मराठी वाहिनीवर होम मिनिस्टरचा विशेष भाग पार पडला. यामध्ये विजेत्या वहिनींना सव्वा लाखाची पैठणी मिळणार होती.

‘दार उघड बाई… दार उघड’ अशी हाक साधारण २० वर्षांपूर्वी ऐकू आली आणि पैठणीचा खेळ रंगायला सुरुवात झाली . मात्र आता मागील २० वर्षांपासून घरोघरी रंगलेला पैठणीचा खेळ संपला आहे. आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर (Home Minister) ह्या कार्यक्रमाने आता अखेर निरोप घेतला आहे. निरोप घेण्याआधी झी मराठी वाहिनीवर होम मिनिस्टरचा विशेष भाग पार पडला. यामध्ये विजेत्या वहिनींना सव्वा लाखाची पैठणी मिळणार होती.

होम मिनिस्टरच्या विशेष भागात झी मराठीवरील नायिकाच या भागात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत सरस्वती जहागीरदार म्हणजेच अभिनेत्री भूमिजा पाटील हिने ती सव्वा लाखाची पैठणी जिंकली. त्यानंतर भूमिजाने या पैठणीसाठी खास पोस्ट केली आहे. भूमिजने पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, “होय, ती सव्वा लाखाची पैठणी मला मिळाली. लहानपणापासून माझी इच्छा होती की कधीतरी होम मिनिस्टर मध्ये जावं मग मलाही पैठणी साडी मिळेल आदेश भाऊजींच्या हस्ते. Manifest करणं म्हणतात ते हेच असावं. जेव्हा मी पैठणीचा खेळ खेळले तेव्हा अजिबात असं डोक्यात नव्हतं की आपण जिंकावं. मला होम मिनिस्टर मध्ये भाग घेता आलं त्यातच मी खुश होते पण माझे सहकलाकार म्हणजेच नवरी मिळे हिटलरला ही टीम माझ्या सोबत होती मला cheer करत होती , त्यांनी मला विश्वास दिला की ही पैठणी तुझीच आहे आणि ही पैठणी तुलाच मिळणार. आणि ते खरं झालं ती “सव्वा लाखाची पैठणी “माझी झाली आणि ही संधी मला झी मराठीमुळे मिळाली”.

आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचा पहिला भाग १३ सप्टेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आदेश बांदेकर ते लाडके भावोजी हा साधारण २० वर्षांचा प्रवास हा सर्वांसाठीच खास आहे. पण आता या प्रवासाने विश्रांती घेत तब्बल २० वर्षांनी सर्व गृहिणींचा निरोप घेतला आहे.

एकनाथ खडसे हे हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन जाताना मी बघितलं; गिरीश महाजनांचे खोचक प्रत्युत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss