spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत एकत्र चर्चा करु: Nana Patole

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने आता सर्वच पक्ष कसून तयारीला लागल्याचे दिसत आहे. सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांचे राज्यभर दौरे, बैठका आणि चर्चा सुरु असून विधानसभेसाठी रणनीती आखण्याचे काम जोरात चालू असल्याचे दिसतात आहे. अश्यातच, आज (सोमवार, २३ सप्टेंबर) काँग्रेसचे (Congress) राज्यातील प्रमुख नेते चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मोठे भाष्य केले आहे.

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांच्या काँग्रेस कमिटीची बैठक आज पार पडणार आहे. यावेळी, महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली असता नाना पटोले यांनी ‘विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच महाविकास आघाडीमध्ये बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेवू,’ असे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

यावेळी माध्यमांशी संवाद साधत नाना पटोले म्हणाले, “प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना असं वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. ते स्वाभाविक आहे. निवडणुकी नंतरच महाविकास आघाडीमध्ये बसून यावर निर्णय घेवू. भाजप सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत आहे. लोकांना पश्चाताप होत आहे. कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असली तरी त्याला फार महत्त्व नाही. मी जर तर वर विश्वास ठेवत नाही. मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझ्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण यांचे प्रश्न महत्वाचे आहे. विचार वाचवणे, शेतकरी वाचवून तरुणांना, गरिबांना न्याय देणे. हे महत्वाच आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “प्राथमिक चर्चा असल्याने आपापला पक्ष दावा करत आहे. हा तिढा नसून समोपचराने प्रश्न सोडवू. नागपूरमध्ये सहा जागा काँग्रेसला मिळाव्या अशी मागणी आहे. मेरीटहि काँग्रेसच्या फेव्हरला जातो,” असे ते यावेळी म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल आहे. मुंबईचा सर्व्हे आला त्यात आश्चर्य नाही. महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळणार आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून घेऊ. तो योग्य वेळी घेऊ. उत्साही कार्यकर्ते असतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव येत असतात. त्यावर लक्ष देण्याची गरज नाही. महाविकास आघाडी म्हणून जो व्हायचा तो निर्णय होईल,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

वरळीत तीन आमदार मात्र झिरो विकास! Shrikant Shinde यांची उबाठावर घणाघाती टीका

Devendra Fadnavis on Koli Bhavan: आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूने खंबीरपणे उभे, Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss