spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाचा सातवा दिवस; Sambhajiraje Chhatrapati यांनी घेतली जरांगेची भेट

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा आमरण उपोषणाचा आज (सोमवार, २३ सप्टेंबर) सातवा दिवस आहे. जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांची तब्येत खालावली असून त्यांना आधाराशिवाय उठणंही शक्य होत नसल्याचे दिसत आहे. असे असतानाच आज संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगेची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून प्रकृती ढासळलेल्या जरांगे यांनी उपोषणाच्या सातव्या दिवशीही उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान आज मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची महत्वाची बैठक होणार असून सरकार यावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावेळी, छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना,”इथे जर काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असणार,” असा पवित्रता घेतलाय आहे.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकारने अजूनही निर्णय घेतलेलाअ नाही. तुम्ही सत्तेत बसलेला हात. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सरकार कसं आरक्षण देणार यावर भाष्य करायला हवं. हे आरक्षण कसं टिकणार आहे यावर बोला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला. अठरापगड जातींसह बारा बलुतेदारांना न्याय दिला. त्यामुळे जे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात त्या सरकारनं सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी,” असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटलांनी तब्येत सांभाळायला पाहिजे. मी त्यांच्याशी व्यक्तिगत बोललोय. मनोज जरांगे पाटलांच्या सोबत मी आधीसुद्धा होता. आताही आहे. आणि या पुढेसुद्धा असणार. माझी सरकारला विनंती आहे कि इकडे या आणि परिस्थिती काय आहे ते बघा. तुमच्याकडे हेलिकॉप्टर आहेत. या इकडे बघा काय परिस्थिती आहे. तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत. इथे जर काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असणार. विरोधकही तेवढेच जबाबदार असतील. मनोज जरांगे पाटील या समाजासाठी योद्धा म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजीराजे छत्रपतींची आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

वरळीत तीन आमदार मात्र झिरो विकास! Shrikant Shinde यांची उबाठावर घणाघाती टीका

Devendra Fadnavis on Koli Bhavan: आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूने खंबीरपणे उभे, Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss