spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश, मंत्रिमंडळात घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज २३ सप्टेंबर २०२४ रोजी मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे :

  •  लोहगाव विमानतळाचे नाव ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे करण्याचा निर्णय
  •  बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी
  •  धान उत्पादकांना दिलासा : आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
  •  कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश
  •  जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय
  •  शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प
  •  करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा
  •  यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते
  •  क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड
  •  ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद
  •  राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम; राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प
  •  हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार
  • एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार
  •  ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ
  • राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ
  •  राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण
  •  छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये
  •  अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा
  •  जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी
  •  श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार
  •  दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान
  • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर

हे ही वाचा:

‘नवरा माझा नवसाचा २’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; तीन दिवसांत इतक्या रुपयांचे कलेक्शन

मार्क्सवादी नेते अनुरा दिसानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष; आज शपथविधी पडणार पार

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss