spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Narendra Modi Birthday 2022 : पंतप्रधानांच्या ७२ व्या वाढदिवसानिम्मित शुभेच्छांचा वर्षाव, वाचा कुणी कुणी दिल्या शुभेच्छा!

आज (१७ सप्टेंबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ७२ वा वाढदिवस आहे. यानिमित्त देशातील विविध राज्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

आज (१७ सप्टेंबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ७२ वा वाढदिवस आहे. यानिमित्त देशातील विविध राज्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. आजचा दिवस पंतप्रधानांसाठी खूप व्यस्त असणार आहे. आज पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ते आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तेथील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून भारतात आणलेले ८ चित्ते सोडण्यात येणार आहेत. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विविध कार्यक्रमदेखील राबविले जात असून, अनेकांकडून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यामध्ये देशातील विविध नेत्यांचा समावेश आहे.

 गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून लिहिले आहे की, “देशाचे सर्वात लाडके नेते आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. मोदीजींनी त्यांच्या प्रथम भारत या विचाराच्या आधारावर गरिबांच्या कल्याणासाठीचे संकल्पासारखी अशक्य कामे शक्य करून दाखवली आहेत.

 काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे देशाची प्रगती झाली. तसेच सुशासनाला अभूतपूर्व बळ मिळालं आहे. त्यांच्या नेतृत्वात देश मजबूत झाल्याचे सिंह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंआहे.

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभच्छा दिल्या आहेत. तुमच्या नेतृत्वात देशातील भीती, भूक आणि भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे असे गडकरींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 भारताच्या राष्ट्रपतींनीदेखील मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वाखाली अतुलनीय परिश्रम, समर्पण आणि सर्जनशीलतेने राबविण्यात येत असलेली राष्ट्रनिर्माण मोहीम अशीच सुरू राहो, अशी इच्छा आहे. देव तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो.”

महाराष्ट्रातही १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ (Seva Pandharvada) आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Birthday) यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती. या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

PM Narendra Modi Birthday 2022: पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या ‘ या ‘ पाच निर्णयांमुळे देशात घडले मोठे बदल.

PM Narendra Modi Birthday 2022 : मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार ‘हि’ खास गोष्ट

PM Modi Birthday : ‘५६ इंच’ थाळी संपवा आणि जिंका ‘साडे आठ लाख’ रुपयांचं बक्षीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss