spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Akshay Shinde Encounter: आधी भरचौकात फाशी देण्याची मागणी मग आता त्या नराधमाविषयी एवढी आपुलकी कशी वाढली? Naresh Mhaske यांचा सवाल

बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसाची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. तीन पोलिस त्यात जखमी आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला. परंतु, विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत, असे म्हणत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के  (Naresh Mhaske) यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे

एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे. जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम रहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी आम्ही ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली, अशी माहिती ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के  (Naresh Mhaske) यांनी दिली.

आता पोलिसांवर आरोप करणे ही…

आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करताय. आता पोलिसांवर आरोप करणे ही दुटप्पीपणी हद्द झाली आहे. या आरोपीला भरचौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली? असा सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

सुरुवातीला अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे समजले होते. परंतु पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती समोर येताच राज्यात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या  प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर भाष्य करत पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, याप्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीदेखील विरोधकांकडून करण्यात आली आहे. त्यातच आता खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या ट्विटमुळे आणखी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

सुप्रिम कोर्टाचा निर्णय देशाच्या बेसिक स्ट्रक्चरविरोधात; आरक्षणावरून Prakash Ambedkar यांचे मोठे वक्तव्य

कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश, मंत्रिमंडळात घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss