spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Big Boss Marathi Season 5: घरातील सदस्यांचा १०० दिवसांचा प्रवास ७० दिवसातच संपणार; फिनालेची तारीख जाहीर

बिग बॉसने मोठे बदल केले आहेत. हे सिझन १०० दिवसांचे नसल्याचे बिग बॉसच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर या सिझनची फिनालेची अंतिम तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

मराठी टेलिव्हिजनवर बिग बॉस मराठी सिझन ५ (Big Boss Marathi Season 5) चांगलाच धमाका करताना दिसत आहे. अनेक दिग्गज कलाकारांपासून ते युट्युबर देखील या सीझनमध्ये सहभागी झाले आहेत. महेश मांजरेकर यांच्यानंतर रितेश देशमुखने या कार्यक्रमाची धुरा सांभाळली. रितेश देशमुखच्या होस्टिंग स्टाईलला सर्व प्रेक्षकांनी पसंती दिली. अगदी सुरुवातीपासूनच या खेळाचं स्वरूप, स्पर्धकांची निवड इतकच नाही तर बिग बॉसच्या होस्टपासून सगळंच बदललेले दिसले. त्यामुळे या खेळात अगदी नवनवीन ट्विस्ट येत होते. त्यातच आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. १०० दिवसात संपणारा हा सिझन आता लवकरच ७० दिवसातच संपणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब लागायची वेळ आली आहे. बिग बॉसचा शो आता ७० दिवसातच संपणार असल्याची अधिकृत माहीती समोर आली आहे.

नुकताच बिग बॉसच्या निर्मात्यांनी घरातील सदस्यांना मोठी बातमी दिली आहे. यंदाच्या सीज़नमध्ये बिग बॉसने मोठे बदल केले आहेत. हे सिझन १०० दिवसांचे नसल्याचे बिग बॉसच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर या सिझनची फिनालेची अंतिम तारीखही जाहीर करण्यात आली आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना सांगण्यात आले आहे की, आता फिनालेला अवघे १४ दिवसचं शिल्लकच बाकी आहेत. ६ ऑक्टोबर २००४ रोजी बिग बॉस मराठी ५ चा फिनाले पार पडणार आहे. यामुळे सदस्यांच्या हातात आता अवघे काही दिवसाचं शिल्लक आहेत. फिनालेमध्ये आता कोणते सदस्य राहणार हेही आता लवकरच सांगण्यात आलं आहे.

बिग बॉसच्या मराठी सीझन ५ चा अंतिम विजेता प्रेक्षकांना येत्या ६ ऑक्टोबरला मिळणार आहे. म्हणजेच आता बिग बॉस फक्त १४ दिवस असणार आहे. आता प्रेक्षकांना पुढील काही दिवसच फुल मनोरंजन बघायला मिळणार आहे. अभिजित सावंत आणि वर्षा उसगांवकर यांच्याकडे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. वर्षा उसगांवकर या घरात धमाकेदार खेळ खेळताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच दोन ग्रुप पाहायला मिळाले. घरात सध्या वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, अभिजित सावंत, सुरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे आता कोणाला तिकीट मिळणार आणि कोण बाजी मारणार हे पाहून आता रंजक ठरणार आहे.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: कुणालातरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी घेतला आहे का? Prakash Ambedkar

Akshay Shinde Encounter: असे अजून दहा-पंधरा ठोकले तरी काय हरकत नाही पण…काय म्हणाले Nilesh Rane?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss