spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरून, राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. आज सकाळी ७ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुक्ती संग्राम येथे ध्वजारोहण करण्यात आले. मात्र ९ वाजता होणारं हे ध्वजारोहण ७ वाजताच उरकण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून शिवसेनेकडून ध्वजारोहण झालेल्या ठिकाणी पून्हा एकदा अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि अनेक शिवसैनिक अभिवादन करण्यावेळी उपस्थित होते.

आज संपूर्ण मराठवाड्यात मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Muktisangram Din) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. औरंगाबामध्ये या दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशाह यांच्या आदेशावरून निर्णय घेतात. आणि त्यांच्या आदेशावरून हैदराबादला जात आहेत, असा आरोप दावेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरुनही आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामांचा इतिहास शाळेत शिकवा, राज ठाकरेंची मागणी

शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणेवर आरोप करण्यात आला. मुख्यमंत्र्यांसाठी ज्या घोषणा केल्या त्या जुन्या आहेत, त्यातील अनेक कामं सुरू आहेत. नवीन कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केले नसून हा मराठवाड्यावर अन्याय आहे. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा मागे आहे. त्याला पुढे आणण्यासाठी हा क्षण महत्वाचा होता, पण मुख्यमंत्र्यांनी काही नवीन घोषणा केली नाही. नऊ वाजता आम्ही पुन्हा एकदा अभिवादन करणार आहोत, असं दानवेंनी सांगितलं. दानवे म्हणाले की, भूखंडाच्या सर्व फाईल थांबवल्या आहेत, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उद्योगासाठी हे घातक असून यापूर्वी असं कधीही झालेलं नाही. उद्योजक नाराज असून दिल्लीपर्यंत याच्या तक्रारी गेल्या आहेत. फक्त १५ मिनटं मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमासाठी दिला, हा मराठवाडा मुक्त करणाऱ्यांचा अवमान असल्याची टीका चंद्रकांत खेरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

हे ही वाचा:

…म्हणून चित्त्यांसाठी करण्यात आली मध्यप्रदेशातील ‘ कुनो ‘ ठिकाणाची निवड

भारतात ७० वर्षांनंतर चित्त्याची चाल दिसणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss