Tuesday, September 24, 2024

Latest Posts

Shardiya Navratri 2024 : नवरात्रौत्सव म्हणजे काय ? नवरात्र उत्सव का साजरा करतात माहित आहे का तुम्हाला ?

Shardiya Navratri 2024 : पौराणिक कथेनुसार नवरात्र हा सण साजरा करणे म्हणजे दुर्गा देवीने नऊ दिवस महिषासुर राक्षसाशी युद्ध केले होते. त्या युद्धात दुर्गा देवीचा दहाव्या दिवशी विजय झाला. हा सण फार प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे. पूर्वी हा सण कृषीविषयक महत्वाच्या उद्देशाने साजरा केला जात होता पण नंतर काही काळाने या सणाला धार्मिक महत्व प्राप्त झाले आणि आदिशक्ती भगवती देवीची उपासना करण्यासाठी हा सण साजरा केला जाऊ लागला. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या उपासनेचे विशेष महत्व आहे. हा सण अध्यात्मिक शक्ती आणि ऊर्जेची उपासना व साधना करण्याचा सण म्हणून सर्वत्र ओळखला जातो.

नवरात्रीत घटस्थापनेच्या दिवशी अनेक घरांमध्ये एका परडीत नऊ धान्यांची पेरणी करतात. दसऱ्याच्या दिवशी हे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहिले जातात. या प्रथेमुळे या सणाचे कृषीविषयक महत्व अधोरेखित केले जाते. या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. पहिले रूप शैलपुत्री, दुसरे रूप ब्रह्मचारिणी, तिसरे रूप चंद्रघण्टा, चौथे रूप कृष्मांडा, पाचवे रूप स्कंदमाता, सहावे रूप कात्यानी, सातवे रूप कालरात्री, आठवे रूप महागौरी, नववे रूप सिध्दिदात्री (First Shailaputri, second Brahmacharini, third Chandraghanta, fourth Krishmanda, fifth Skandamata, sixth Katyani, seventh Kalratri, eighth Mahagauri, ninth Siddhidatri)
अशी नऊ निराळी रूपे आहेत.

नवरात्रीच्या दिवसांमध्ये अनेक जण व्रतस्थ असतात. आपापल्या श्रद्धेनुसार किंवा परंपरेनुसार हे उपवास केले जातात. मात्र या व्रतादरम्यान बरेचसे नियम पाळणे गरजेचे असते, नाही तर त्या व्रताचे महत्व राहत नाही. या व्रताने धनधान्य, विद्या, सुख समृद्धी, पुत्रपौत्र, आरोग्य, स्वर्ग आणि मोक्ष यांसारख्या गोष्टींची प्राप्ती होते. देवीचे पूजन, श्रीसुक्त पाठ, ललीतासहस्त्र नामावली, होम, कुमारीका पूजन आणि ब्राह्मण भोजन या प्रकारच्या कार्यांनी हे व्रत यथोचित सफल होते अशी मान्यता आहे.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर… पोलिसांची पहिली पत्रकार परिषद म्हणाले…

Akshay Shinde Encountar: अक्षय शिंदे याला संपवले म्हणून हे प्रकरण संपत नाही, या प्रकरणात कोणाला वाचवलं जातय? Sushma Andhare यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss