Wednesday, September 25, 2024

Latest Posts

Vaibhav Tatwawadi Birthday : इंजिनिअर झालेला वैभव तत्ववादी याच्या अभिनय प्रवासाबद्दल माहित आहे का तुम्हांला ? जाणून घ्या…

Vaibhav Tatwawadi Birthday : मराठी चित्रपट सृष्टीतील एक तरुण अभिनेता वैभव तत्ववादी याचा आज वाढदिवस. वैभव तत्ववादी हा मराठी सिनेमा सृष्टीतील एक देखणा आणि सरस अभिनेता आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील ‘चॉकलेट बॉय’ म्हणूनही तो ओळखला जातो. त्याने त्याच्या अभिनयाची छाप ही केवळ मराठी चित्रपट व रंगभूमीवरच सोडली नाही. तर त्याचा अभिनय प्रवास हा हिंदी सिनेमा आणि वेबसीरिजपर्यंत (Webseries) जाऊन पोहचला आहे. वैभवने त्याच्या करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

वैभव तत्ववादीचा जन्म हा २५ सप्टेंबर १९८८ रोजी नागपूर (Nagpur) येथे झाला. वैभवचे शालेय शिक्षण हे सोमलवार हाय स्कूलमधून पूर्ण झाले. त्यानंतर पुढील पदवी शिक्षणासाठी तो पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात (Engineering College) गेला. पदवीचे अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना त्याने पुण्यात अनेक एकांकिका गाजवल्या. या एकांकिकांच्या मार्गावरूनच त्याचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले. अभिनय क्षेत्राला वैभवने टेलिव्हिजनमधून सुरुवात केली. `अमर प्रेम’ , ‘तुझं माझं जमेना’ , ‘पिंजरा’ यांसारख्या मालिकांमधून वैभव मुख्य भूमिकेत झळकला. त्याचसोबत ‘फक्त लढ म्हणा’ आणि ‘सुराज्य’ यांसारख्या मराठी चित्रपटांमधून चित्रपट माध्यमात पदार्पण केले. अभिनयासह वैभवची नृत्य कलेवरही तितकीच पकड आहे.

२०१५ साली आलेल्या ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटाने वैभवला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यातील वैभव आणि प्रार्थना बेहेरेची (Prarthana Behere) जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. प्रेक्षकांना ती जोडी पुन्हा ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘व्हाट्सअँप लग्न’ या चित्रपटात पाहायला मिळाली. ‘हंटर’ या हिंदी चित्रपटातून वैभवने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तसेच ‘बाजीराव मस्तानी’ (Bajirao Mastani) चित्रपटातून चिमाजी अप्पा या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सर्वांकडून कौतुक केले गेले.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर… पोलिसांची पहिली पत्रकार परिषद म्हणाले…

Akshay Shinde Encountar: अक्षय शिंदे याला संपवले म्हणून हे प्रकरण संपत नाही, या प्रकरणात कोणाला वाचवलं जातय? Sushma Andhare यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss