Wednesday, September 25, 2024

Latest Posts

Big Boss Marathi Season 5:अभिजित सावंत ठरणार का बिग बॉस मराठीचा विजेता? काय आहे व्हायरल सत्य

बिग बॉस मराठीचा अंतिम विजेता कोण ठरणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. पण या चर्चेत एक ट्विस्ट आला आहे. यंदाच्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडण्याआधीच अंतिम विजेत्याचे नाव समोर आले आहे.

यंदाचा बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन (Big Boss Marathi Season 5) जोरदार चर्चेत आहे. पाचव्या सीझनला पहिल्या दिवसापासूनच धमाकेदार सुरुवात झाली. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनबाबत आताच एक मोठी बातमी समोर आली आहे. १०० दिवसांसाठी सुरु झालेला हा शो आता ७० दिवसातच आटोपण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपायला अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. बिग बॉस मराठीचा अंतिम विजेता कोण ठरणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. पण या चर्चेत एक ट्विस्ट आला आहे. यंदाच्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडण्याआधीच अंतिम विजेत्याचे नाव समोर आले आहे.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. त्याआधीच विजेत्याचं नाव चर्चेत आलं आहे. बिग बॉस सीझनचा विजेता आता प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. बिग बॉस प्रेमी याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण त्याआधीच विजेत्याचं नाव चर्चेत आहे. गायक अभिजित सावंत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर बिग बॉसच्या यंदाच्या सीझनची स्पर्धकांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये स्पर्धकांची नावं आणि विजेता आणि उपविजेता असा उल्लेख दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या यादीमध्ये अभिजित सावंत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरणार असल्याची चर्चा आहे. तर अंकिता वालावलकर ही पहिली उपविजेती, सूरज चव्हाण हा दुसरा उपविजेता राहणार असल्याचं दिसून येत आहे. तर जान्हवी किल्लेकर ही तिसरी उपविजेती आणि निक्की तांबोळी चौथी उपविजेती ठरल्याचं व्हायरल झालेल्या यादीत दिसत आहे. येणाऱ्या ग्रॅड फिनालेला नक्की कोण ठरणार अंतिम विजेता आणि कोण ठरणार उपविजेते याची उत्सुकता आता सर्व बिग बॉस प्रेमींना लागून आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली यादी किती खरी ठरणार हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

हे ही वाचा:

घरगुती पद्धत वापरून तिरुपतीचा लाडू बनवा घरीच; जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

Vaibhav Tatwawadi Birthday : इंजिनिअर झालेला वैभव तत्ववादी याच्या अभिनय प्रवासाबद्दल माहित आहे का तुम्हांला ? जाणून घ्या…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss