Wednesday, September 25, 2024

Latest Posts

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं कनेक्शन थेट विधानसभा निवडणुकीशी…; अक्षय शिंदेच्या वडिलांचा कोर्टात गंभीर आरोप, म्हणाले…

बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली.

बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. आता राज्यभरात वातावरण तापलंय. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. याचदरम्यान आज अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने फौजदारी रिट याचिका केली आहे. अक्षयच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून हे एन्काऊंटर फेक असल्याचा दावा केला आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे ही सुनावणी सुरू आहे. यावेळी आरोपीच्या बाजूने वकील अमित कटारनवरे हे बाजू मांडत आहेत. आरोपीच्या वकिलाने अक्षयची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे.

बदलापूर प्रकरणात काही आरोपी आहेत. त्यांना पॉक्सो लावण्यात आला आहे. या आरोपींना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेला मारलं गेलं, असा आरोपही याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला आहे. दरम्यान, कोर्टाने या एन्काऊंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागितला आहे. गोळी कुठून चालली? किती लांबून गोळी मारली गेली याची माहिती देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसेच कोर्टाने अनेक मुद्दयांवरून सरकारी वकिलांना धारेवरही धरले आहे.

मृत आरोपी अक्षय शिंदेचे (Akshay Shinde) वडील अण्णा शिंदे हे कोर्ट रूममध्ये आले आहेत. याचिकाकर्ते यांचे वकील अमित कटारनवरे युक्तिवाद करत आहेत. मुलाने कोणताही त्रास नाही, असं रिमांड कॉपीत सांगितलं होते. जामिन होऊ शकतो का? यावर त्याने जामिन होऊ शकतो असंही सांगितलं होतं. त्याने 500 रुपये मनी ऑर्डर करायला सांगितले होते. माझ्या मुलाची पिस्तूल हिसकावण्याची हिंमत नाही. मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासासाठी माझ्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. भविष्यात निवडणूक असल्याने मुलावर रोष असल्याने त्याचा राजकाय फायदा घेतला जात असल्याचा संशय देखील अक्षयच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss