Wednesday, September 25, 2024

Latest Posts

Big Boss Marathi Season 5:अरबाजचे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचे कारण काय?

अरबाजाच्या जाण्याने निक्कीला खूप मोठा मानसिक धक्का बसला. बिग बॉसने माझं साम्राज्य हलवल्याचाही उल्लेख निक्कीने बऱ्याचदा केला. पण, आता अरबाजच्या घराबाहेर पडण्यामागे खूप मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे.

बिग बॉस मराठी सीझन ५ (Big Boss Marathi Season 5) च्या घरात पहिल्या दिवसापासूनच काही ना काही राडे पहायला मिळत आहेत. बिग बॉस आता शेवटच्या टप्प्यात पदार्पण करत आहे. त्यातच गेल्या आठवड्यात अरबाज पटेल (Arbaz Patel) याने एक्झिट घेतली. सुरुवातीपासूनच अरबाज हा ट्रॉफीचा दावेदार खेळाडू म्हणून ओळखला जात होता. अरबाजच्या जाण्याने घरात कलह करणारी त्याची घट्ट मैत्रीण निक्की तांबोळी (Nikki Tamboli) पूर्णपणे तुटून गेली. अरबाजाच्या जाण्याने निक्कीला खूप मोठा मानसिक धक्का बसला. बिग बॉसने माझं साम्राज्य हलवल्याचाही उल्लेख निक्कीने बऱ्याचदा केला. पण, आता अरबाजच्या घराबाहेर पडण्यामागे खूप मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे.

बिग बॉसच्या घरातून अरबाज बाहेर पडल्यामुळे प्रेक्षकांनाही धक्का बसला होता. पण, अरबाज घराबाहेर पाडण्यामागचं कारण समोर आलं आहे. अरबाज पटेल मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडून आगामी हिंदी बिग बॉसच्या अठराव्या सीझनमध्ये खेळताना दिसणार आहे अशी चर्चा सध्या सुरु आहे. अरबाज घराबाहेर पडल्यानंतर त्याने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी अरबाजने केलेल्या वक्तव्यामुळे अरबाज खरंच बिग बॉस हिंदीमध्ये खेळताना दिसू शकतो, अशी चर्चा आहे.

अरबाज बिग बॉसच्या घरात तब्बल ५७ दिवस राहिला. अरबाज म्हणजे निक्की आणि निक्की म्हणजे अरबाज, हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला बघायला मिळालं आणि त्यावरून त्यांची वेळोवेळी शाळाही घेण्यात आली. कधी दंगा, तर कधी भांडण आणि ओरडओरडा करणाऱ्या निक्कीच्या बाजूने नेहमीच अरबाज उभा राहिला. अरबाजने आपल्या स्वभावाच्या सर्वच बाजू या प्रेक्षकांना दाखवल्या. काहींनी अरबाजच्या खेळाचं कौतुक केलं, तर काहींनी त्याला झोडून काढलं. अरबाजचा बिग बॉस मराठी सीझन ५ चा प्रवास जरी संपला असला तरी येणाऱ्या हिंदी बिग बॉसमध्ये तो दिसणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर होऊच शकत नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धरले धारेवर

Akshay Shinde Encountar: चार पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला? रिव्हॉल्वर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे काय? मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना गंभीर सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss