spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आशिष शेलारांनी केला शिवसेनेवर गंभीर आरोप

महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसांपासून वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प बहुचर्चित आहे. सत्ताधारी आणि विरोधक आपसात भिडले आहेत. आशिष शेलारांनी सुरुवातीपासूनच वेदांत प्रकल्पावरून शिवसेनेला निशाण्यावर घेतलं आहे. आज पुन्हा एकदा आशिष शेलारांकडून शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वेदांता कंपनीकडे टक्केवारी मागितल्याचा गंभीर आरोप भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. शेलारांनी ट्विटमधून शिवसेनेला अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणतात, “गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवली, अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी १० टक्के लाच द्यावी लागत होती, इतका भ्रष्टाचार बोकाळला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प दीड लाख कोटींचा होता, मग इथं किती टक्के मागितले होते? १० टक्क्यांनुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतल्या रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे, जनतेसमोर सत्य यायलाच हवं.”

 वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद दिसून येत आहे. विरोधी पक्षांकडून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटावर टीका केली जात आहे. राष्ट्रवादीकडून पुण्यात लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले तर मुंबईत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई पोलिसांनी राष्ट्रवादीच्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर दुसरीकडे शिवसेना आणि युवासेना सुद्धा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. युवासेने सचिव वरून सरदेसाई यांनी महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना मार्फत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती.

तर शिंदे आणि भाजपसुद्धा विरोधकांवर चांगलीच टीका करत आहे. महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे गेल्याचा आरोप सरकारकडून करण्यात येत आहे. तर आज भाजपाचे प्रदेश अध्य्क्ष आशिष शेलार यांनी गंभीर आरोप करण्यात आले आहे. आशिष शेलार यांनी वेदांता कंपनीकडे टक्केवारी मागितल्याचा आरोप केला आहे. शेलारांनी ट्विटमधून शिवसेनेला अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारला आहे. वेदांताचा हा मोठा प्रकल्प हातातून निसटल्याने आधीच मोठा गदारोळ सुरू आहे. त्यात आता आशिष शेलारांच्या आरोपांमुळे आता वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीचं सरकार आणि आत्ताचं सरकार दोघेही हा प्रकल्प जाण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलताना दिसत आहेत. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र याबद्दल मोदींशी संवाद साधला आहे. त्यावर मोदींनी महाराष्ट्राला यापेक्षा मोठा प्रकल्प देण्याचं आश्वासन दिल्याचा दावा शिंदेंनी केला आहे.

हे ही वाचा:

भारतात ७० वर्षांनंतर चित्त्याची चाल दिसणार

नक्की काय आहे भारताचं ‘प्रोजेक्ट चित्ता’?

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss